Spinner Imran Tahir | इम्रान ताहिरचे भारतीय क्रिकेट चाहत्यांबद्दल मोठे वक्तव्य; म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Spinner Imran Tahir | दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फिरकीपटू इम्रान ताहिरने भारताबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. त्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. भारताच्या चाहत्यांइतकी क्रिकेटपटू आणि क्रिकेटप्रेमाशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही असेदेखील इम्रान ताहिर म्हणाला आहे. आयपीएल सुरू झाल्यापासून जगभरातील खूप क्रिकेटपटू भारतात खेळायला येऊ लागले आहेत. त्यांच्या खेळामुळे ते भारतीय चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहेत. (Spinner Imran Tahir)

 

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फिरकीपटू इम्रान ताहिरसुद्धा भारतीय चाहत्यांमध्येही खूप लोकप्रिय आहे. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसह अनेक संघांकडून खेळला आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलचे एकूण सात हंगाम खेळले आहेत. त्यामुळे तो भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. इम्रान ताहिर सध्या आंतरराष्ट्रीय लीग टी-20 मध्ये एमआय एमिरेट्सकडून खेळत आहे. इम्रान ताहिरने आयपीएलमध्ये एकूण 59 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 82 विकेट घेतल्या आहेत. 2019 च्या आयपीलमध्ये त्याने पर्पल कॅप जिंकली होती. त्याच्या फिरकीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज अंतिम फेरीत पोहोचली होती. (Spinner Imran Tahir)

 

”जर तुम्ही क्रिकेटर असाल तर तुम्हाला भारतात खेळण्यासाठी एक्सपोजरची गरज नाही. भारतातील क्रिकेटबद्दल चाहत्यांची उत्कटता आणि ते त्याला ज्याप्रकारे पाठिंबा देतात याला उत्तर नाही. सात वर्षे आयपीएलमध्ये खेळणे हा माझ्यासाठी चांगला अनुभव होता. ही माझ्यासाठी खूप सन्मानाची बाब आहे.” असे इम्रान ताहीर एका मुलाखतीदरम्यान म्हणाला आहे.

 

Web Title :- Spinner Imran Tahir | spinner imran tahir has been highly appreciated by india and indian fans

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Bachchu Kadu | ‘मंत्रिमंडळ विस्तार केला नाही तर…’, बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

Vanita Kharat | वनिता खरातच्या उखाण्याने वेधले सर्वांचे लक्ष; म्हणाली “सुमित तूच माझा महाराष्ट्र…”

Pune Pimpri Chinchwad Crime | भागिदार आणि कर्मचाऱ्याकडून कंपनीला 3 कोटींचा गंडा, भोसरी एमआयडीसी परिसरातील प्रकार

Pune Crime News | बेधूंद वातावरणात लोणावळ्यातील व्हिस्प्रींग वुड हॉटेलमध्ये सुरु होता अश्लिल डान्स ! पुणे ग्रामीण पोलिसांनी बंद केली छमछम; 53 जणांवर कारवाई, 9 महिलांचा समावेश