पुणे: पोलिसनामा ऑनलाईन
संपूर्ण जगात मानवता ,शांती, शाकाहार सेवन यांचा संदेश देत जगभर प्रचार करणारे आणि संपूर्ण जगभर कार्यरत असणारे दादा जे पी वासवानी यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी आज सकाळी पुणे येथे निधन झाले. दादा वासवानी याचे नाव आदरणीय अध्यात्मक लोकांमध्ये घेतले जाते. त्याच्या अचानक जाण्याने पुण्यातीलच नव्हे तर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. संपूर्ण जगभरात त्याचे शिष्य आहेत. आज पुणे येथे त्याचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
दादा जे पी वासवानी हे पुण्यातील साधू वासवानी मिशनचे प्रमुख संचालक होते. हे मिशन एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील निःस्वार्थी संस्था, समाज कल्याण आणि सेवा या बाबत जोडले गेले आहे. या संस्थेचे मुख्यालय पुण्यामध्ये असून जगभरात त्याच्या अनेक ठिकाणी शाखा आहेत. २ ऑगस्ट १९१८ मध्ये दादांचा जन्म त्याकाळच्या हैद्राबाद सिंध प्रदेशात झाला होता. ते खूप हुशार विद्यार्थी होते. त्यांनी आपले अर्धवट शिक्षण सोडून उरलेले सारे आयुष्य आजचे अत्यंत प्रतिष्ठित संत,त्याचे काका, गुरु साधू वासवानी यांना जीवन समर्पित केले
[amazon_link asins=’B00UFF422M’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5c88323f-8599-11e8-9a31-e927d58b7191′]
शाहाकारिचे नेहमीच समर्थक असणारे दादा यांनी गुरु साधू वासवानी यांच्या शिकवणी नुसार सर्व सजीव सृष्टीप्रति सन्मान आणि मानवता हाच संदेश जगभरात पोहचवण्याचा त्याचा उद्देश होता. दादांच्या नेतृत्वा मुळे साधू वासवानी मिशनने आध्यात्मिक प्रगती, शिक्षण, औषध, महिला सक्षमीकरण, मदत, पशु कल्याण, ग्रामीण विकास आणि समाजातील वंचित घटकांची सेवा अश्या सामाजिक कार्यात प्रबळ कामगिरी केली आहे.
‘गरीबांची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे.’ या गुरूंच्या शब्दावर त्यांचा खूप विश्वास होता. ९८ वर्ष वय असलेल्या दादाकडे तरुणांना लाजवेल इतका उत्साह आणि काम करण्याची प्रबळ इच्छा होती. विनोदप्रिय वक्ता आणि प्रेरक लेखक अशी त्याची ख्याती होती. त्यांचे खूप वाचन होते त्याबरोबरच त्यांनी अनेक पुस्तके लिहली आहेत. आध्यात्मिक गुरू, शिक्षणतज्ज्ञ आणि तत्त्वज्ञानी दादा जे.पी. वासवानी हे भारताचे ज्ञान आणि जागतिक भावनांचे खरे आणि आदर्श व्यक्तिमहत्व होते. त्याच्या जाण्याने आध्यात्मिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे असेच म्हणावे लागेल.