रिपब्लिकन पक्षात आणखी फूट, राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. गायकवाड यांचा राजीनामा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. अशोक गायकवाड यांनी पक्षाचा राजीनामा दिला. गायकवाड लवकरच युनायटेड रिपब्लिकन पक्ष स्थापन करणार आहेत. आठवले आणि आंबेडकर यांच्याशी नाराज असणाऱ्या कार्यकत्यांना त्यांनी पक्षात येण्याचे आवाहन केले आहे. अहमदनगर येथे घेतलेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
जाहिरात

गायकवाड यांच्या  राज्य उपाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या फुटीत आणखी भर पडली आहे. अ‍ॅड. अशोक गायकवाड हे रिपार्इंचे राज्य उपाध्यक्ष तसेच, प्रवक्ता आहेत. त्यांनी पक्षाच्या सगळ्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना गायकवाड म्हणाले, रामदास आठवले यांनी भाजपशी युती केली आहे. त्यामुळे पक्षामध्ये वैचारिक संभ्रम तयार झाला आहे. तसेच, भीमा कोरेगावसंबंधी त्यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. यामुळे मोठा वर्ग पक्षापासून दूर गेला आहे. दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांची नक्षलवाद्यांसोबतची जवळीक नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. या दोघांबद्दल भ्रमनिरास झालेल्या कार्यकर्त्यांना स्वतंत्र  प्रकाश आंबेडकरांव्यासापीठाची आवश्यकता होती. त्यामुळे आपण नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वीच रामदास आठवले यांनी पक्षाला राज्यात मिळणारे एक मंत्रीपद दोन कालावधीत दोन कार्यकत्यांना वाटून देण्यात येईल, असे म्हटले होते. तसेच त्यानंतर त्या दोन कार्यकर्त्यांची नावेही आठवले यांनी जाहीर केली होती.