शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे कोल्हाटीबुवा ग्रामविकास प्रतिष्ठान हे सातत्याने विधायक उपक्रम राबवित आहेत. यावर्षी शिवजयंती साधेपणाने साजरी करत प्रतिष्ठानने रक्तदान शिबिर भोसरी येथील रेड प्लस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते.

प्रारंभी छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यानंतर प्रत्यक्ष शिबिरास सुरुवात करण्यात आली. या शिबिरात शिरसगाव काटा व परिसरातील युवकांनी सहभाग घेत सुमारे ७७ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र व छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट देण्यात आली.

यावेळी अध्यक्ष राहुल कदम, जयदीप पवार, किरण काटे, गणेश शिंदे, प्रा. सचिन आवारे, प्रा. सचिन विधाते, मयूर जगताप, अनोज माने, पत्रकार सतीश केदारी यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी शिरसगाव काटा व पंचक्रोशीतील युवक, ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते.