महिला खेळाडूवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्यावर्षी झालेल्या आशिषाई स्पर्धेत भारतीय संघासोबत असणाऱ्या भारताच्या महिला कबड्डीपटू उषा राणीवर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेत भारतानं रौप्य पदकाची कमाई केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार उषावर बंगळुरुमध्ये हल्ला झाला आहे. कर्नाटक कबड्डी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. या प्रकरणी कर्नाटक कबड्डी संघटनेचे सचिव मणीराजू, माजी कबड्डीपटू बी. सी. रमेश आणि नरसिंहा या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. उषा ही कर्नाटकची स्टार कबड्डीपटू आहे.

अटक केलेल्या तिघांवरही आयपीसी कोड 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनाही त्यामुळे आता जामीन मिळणार नाही. उषा राणीवर झालेल्या हल्ल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –