MS धोनीनं 2019 च्या वर्ल्डकप ‘सेमीफायनल’मध्ये झालेल्या Run Out बद्दल मौन सोडलं, केलं ‘हे’ वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २०१९ क्रिकेट विश्वचषकातील उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाला. महेंद्रसिंग धोनी दुर्दैवी पद्धतीने रन आउट झाल्याने भारताची सामना जिंकण्याची आशा ढासळली. महेंद्रसिंग धोनीने आता रन आउट होण्याबाबत बोलताना म्हंटले कि, रन होण्यापासून वाचण्यासाठी त्याने डाइव्ह मारायला हवी होती. दरम्यान, त्या उपांत्य सामन्यात ७२ चेंडूत ५० धावा केल्यावर मार्टिन गप्टिलच्या डायरेक्ट थ्रोने एमएस धोनीला रन आउट केले. धोनी आउट झाल्यामुळे भारताचा पराभव निश्चित झाला. धोनी क्रिकेट जगतात विकेट्स दरम्यान वेगवान धावांसाठी ओळखला जातो. धोनीची रन आउट झाल्याने कोट्यावधी भारतीयाच्या आशा तुटल्या.

२४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा अव्वल क्रम ढासळला होता. यानंतर रवींद्र जडेजा (७७) आणि एमएस धोनी यांनी ११६ धावांची भागीदारी करत भारताला सामन्यात कायम राखले. शेवटच्या दोन षटकांत भारताला विजयासाठी ३१ धावांची गरज होती, धोनीने लोकी फर्ग्युसन च्या बॉलवर षटकारासह अर्धशतक पूर्ण केले. त्याच ओव्हरमध्ये दुसरी धाव घेताना मार्टिन गप्टिलच्या डायरेक्ट थ्रोवर धोनी रन आउट झाला.

माघारी परतताना धोनीच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. धोनी म्हणाला कि, “मला दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी डाइव्हेल करायला हवे होते.” पहिल्या सामन्यात मी रन आउट झालो होतो आणि उपांत्य फेरीच्या सामन्यातही मी रन आउट होतो. मी स्वत: ला नेहमी म्हणतो की, मी क्रीजवर जाण्यासाठी डाइव्ह का मारली नाही, मी क्रीझपासून दोन इंच अंतरावर होतो. मी त्यावेळी डाइव्ह मारायला हवी होती.’ दरम्यान, धोनी आउट झाल्यांनंतर भारताने युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमारची विकेट गमावली आणि भारताचा डाव संपला.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/