ICC World Cup 2019 : ‘भारत-पाक’ सेमीफायनलमध्ये भिडणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव करत या स्पर्धेत आपली विजयी मालिका कायम राखली आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ च्या पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडची टीम ११ पॉईंट्स मिळवत अव्वल स्थानावर आहे.

दुसऱ्या स्थानावर १० पॉईंट्स मिळवत ऑस्ट्रेलिया आहे. टीम इंडिया ९ पॉईंट्नी तिसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लड आठ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या स्पर्धेत भारत ज्याप्रकारे खेळत आहे आणि सध्या भारतीय संघाचा फॉर्म बघता या स्पर्धेत भारतीय संघालाच संभाव्य विजेते म्हणून पहिले जात आहे. कर्णधार विराट कोहली आणि त्याचे शिलेदार या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत असून भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. हि स्पर्धा आता मध्यावर आली असून त्यामुळे गुणतालिकेत सर्वात वर असलेले चार संघच सेमीफायनलमध्ये जाणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

मात्र या सगळ्यात पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत अडखळताना दिसून येत आहे. मात्र त्याचबरोबर पाकिस्तानसाठी देखील सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानचे पाच गुण झाले आहेत. त्यामुळे उर्वरित पुढील तीनही सामन्यांत त्यांनी विजय मिळवल्यास त्यांना सेमीफायलचे दरवाजे उघडे राहतील. सध्या पाकिस्तान ५ गुणांसह गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानने मिळवलेल्या विजयानंतर त्यांचे मनोबल उंचावले आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यात विजय मिळवला आणि बाकी संघांची गणिते चुकली तर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतो.

सेमीफायलमध्ये भारत पाक आमने सामने

अशा परिस्थितीत जर पाकिस्तानने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला तर पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांना भारत आणि पाकिस्तान सामना बघायला मिळू शकतो. पाकिस्तानने पुढील तीनही सामन्यात विजय मिळवला तर पाकिस्तान गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर येऊ शकतो. अशा परिस्थितीत भारत आणि पाक पुन्हा  एकदा आमने सामने येऊ शकतात.

परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा भारतीय संघ आपले उर्वरित सर्व सामने जिंकून गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आला आणि पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर. जर असे झाले तर भारत आणि पाक पुन्हा मँचेस्टरच्या मैदानावर आमनेसामने येतील जेथे भारताने पाकिस्तानला १६ जून रोजी झालेल्या साखळी सामन्यात हरवले होते. मात्र भारताला पहिल्या क्रमांकावर राहण्यासाठी न्यूझीलंडच्या कामगिरीचा देखील आधार घ्यावा लागणार आहे. कारण न्यूझीलंडचा संघ देखील या स्पर्धेत अपराजित आहे.

दरम्यान, इंग्लंडविरुद्ध भारताचा सामना ३० जूनला होणार आहे. दरम्यान त्याआधी भारत बांगलादेश आणि वेस्ट इंडिजविरुद्ध लढेल. भारताने गुणतक्त्यात पहिले स्थान मिळवल्यास चौथ्या स्थानावर असलेल्या संघासोबत सेमिफायनलला लढत होईल.त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात सेमीफायननला लढत होते कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

कामसूत्र फॉलो करा, संभोगसुखाचा मिळेल पूर्ण आनंद

रोज सकाळी कोमट पाणी प्या, होतील ‘हे’ १० फायदे

हार्ट अटॅक अनेकदा सकाळीच का येतो? बचावाचे उपाय

‘हे’ चिमूटभर नैसर्गिक ‘माऊथ फ्रेशनर’ खा, होतील अनेक फायदे