तिरंग्याची ‘शान’ वाढवणार्‍या मुलींना पद्म सन्मान, ‘क्रीडा’ मंत्रालयानं ‘गृह’ मंत्रालयाकडं पाठविली नावांची यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रीडाजगतात भारताचे नाव देश-विदेशात उंचावणाऱ्या मुलींचा सम्मान करण्यासाठी क्रीडामंत्रालयाने मोठे पाऊल उचलले आहे. क्रीडामंत्रालयाने स्वतः विचारविनिमय करून गृह मंत्रालयाकडे बॉक्सर एमसी मेरी कोमची सर्वोच्च नागरी सन्मान पद्म विभूषण आणि नुकताच विश्वविजेते पीव्ही सिंधू हिची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.

जर पद्म पुरस्कार समितीने मेरीला हा सन्मान दिला तर ही प्रतिष्ठा मिळवणारी ती देशातील पहिली महिला खेळाडू ठरेल. यासोबतच मंत्रालयाने टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, कुस्तीपटू विनेश फोगट, गिर्यारोहक ताशी  आणि नुंग्शी मलिक, हॉकी संघाचा कर्णधार राणी रामपाल, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर आणि ऑलिम्पियन नेमबाज सुमा शिरुर यांची  पद्मश्री पुरस्करसाठी शिफारस केली आहे.

सचिननंतर प्रथमच पद्मविभूषणसाठी नामांकन –

भारतरत्न सचिन तेंडुलकर हा क्रीडा इतिहासातील एकमेव खेळाडू आहे ज्याला पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे.  2008 मध्ये माऊंट एव्हरेस्टवर न्यूझीलंडचा गिर्यारोहक सर एडमंड हिलरीसोबत त्याला पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने पद्मविभूषणसाठी कोणत्याही खेळाडूच्या नावाची शिफारस केलेली नाही. सहा वेळची  विश्वविजेती  आणि राज्यसभेच्या खासदार मेरी यांना 2006 मध्ये पद्मश्री आणि 2013 मध्ये पद्मभूषण, तर सिंधू यांना 2015  मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

यावेळी मंत्रालयाने पद्म पुरस्कारांसाठी 11 नावांची शिफारस केली आहे. या महिला खेळाडूंव्यतिरिक्त आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन वेळा पदक जिंकणारी आणि नुकताच देशाला टोकियो ऑलिम्पिकचा कोटा देणारा तिरंदाज तरुणदीप, म्यूनिच ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणार्‍या हॉकी टीमचा सदस्य  गणेश यांचीही पद्मश्रीसाठी शिफारस केली आहे.