मुस्लिम असल्यामुळं तिनं ‘बॉडी-बिल्डींग’ स्पर्धेत बिकिनी नाही घातली, पुढं झालं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बांगलादेशमध्ये रविवारी एक नवा इतिहास रचला गेला. जेव्हा या देशात प्रथमच महिला बॉडी-बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन केले गेले. ढाका येथे आयोजित ही स्पर्धा 19 वर्षांची विद्यार्थिनी अवोना रहमानने जिंकली. विशेष म्हणजे अवोना रहमानने कोणतेच मसल्स न दाखवता ही स्पर्धा जिंकली.

तीन दिवसांच्या महिला बॉडी-बिल्डिंग स्पर्धा पाहण्यासाठी ढाका येथे शेकडो लोक जमले होते. आपल्या विजयानंतर अवोना रहमान खूपच आनंदी दिसत होती. तिने आपला आनंद व्यक्त करत म्हटले की, ‘मी यासाठी खूप मेहनत घेतली होती. चॅम्पियन झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. माझे शरीर दाखविल्यामुळे माझ्यावर अनेक टीका होऊ शकते. आम्हाला या स्पर्धेसाठी एक विशेष ड्रेस कोड दिला होता.’

अवोनाचा भाऊ देखील एक बॉडी-बिल्डर आहे. जो स्वत: जीम चालवतो. त्याने अवोनाला बॉडी-बिल्डर बनण्यासाठी खूप प्रोत्साहन दिले आहे. अवोनाने आपल्या विजयाचे श्रेय आपल्या मोठ्या भावाला दिले आहे.

भारतासोबतच दुनियाभरात महिला बॉडी-बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये महिला मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात. सोशल मीडियावर अनेक महिला बॉडी-बिल्डर्स आहे ज्यांना लाखो लोक फॉलो करतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/