Gold Rates Today : सलग 5 व्या दिवशी ‘सोन्या-चांदी’च्या किंमतीत तेजी, दर पुन्हा 50 हजारांपेक्षा जास्त

पोलिसनामा ऑनलाइन – भारतीय रिटेल मार्केटमध्ये आज सलग पाचव्या दिवशी सोन्याचांदीच्या स्पॉट किंमतीमध्ये (Spot Price of Gold and Silver) तेजी पाहायला मिळाली. दरम्यान, सोमवारी दिल्लीमध्ये सोन्याचे दर ४९६ रुपये प्रति तोळाने वाढून ५०,२९७ रुपये प्रति तोळा झाले होते. मुंबईतील रिटेल मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती (Gold Price) प्रति तोळा २०० रुपयांनी वाढून ५०,३०८ रुपये प्रति तोळा झाली आहे. चांदीच्या दरात (Silver Price) देखील सोमवारी मोठी वाढ झाली, चांदीचे दर दिल्लीमध्ये २,२४९ रुपयांनी वाढून ६९,४७७ रुपये प्रति किलो झाली. तर मुंबईमध्ये ६७३ रुपये प्रति किलोने चांदीचे दर वाढले आहेत. या वाढीनंतर चांदी ६७,१९२ रुपये किलोवर पोहोचली आहे. राजधानी दिल्लीमध्ये याआधीच्या सत्रात सोन्याचे दर ४९,८०१ रुपये प्रति तोळावर बंद झाले होते, तर चांदीचे दर ६७,२२८ रुपये प्रति किलोग्रॅम वर बंद झाले होते.

HDFC सिक्योरिटीजचे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल (Tapan Patel) यांच्या मते, यूरोपमध्ये कोरोना व्हायरलचे वाढते संक्रमण, ब्रिटनमध्ये कोव्हिडच्या नवीन स्ट्रेनबाबत समोर आलेली माहिती आहे. त्यानंतर अनेक देशांनी प्रवासावर लावलेले निर्बंध यामुळे सोन्याचांदीच्या किंमतीना सपोर्ट मिळाला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरल्याने देखील सोन्याचांदीचे दर वाढले आहेत.

MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर फेब्रुवारीच्या डिलिव्हरीच्या सोन्याच्या वायदे किंमतीत ०. २३ % अर्थात ११५ रुपयांची तेजी पाहायला मिळाली. यानंतर दर ५०,४१९ रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. तर ५ मार्च २०२१ च्या डिलिव्हरीच्या चांदीमध्ये ०. ३५ % अर्थात २३५ रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर दर प्रति किलो ६७. ६७२ रुपये प्रति किलोवर पोहोले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर १,८९८ डॉलर प्रति औंस आणि चांदी २६. ६३ डॉलर प्रति औंस वर पोहोचले होते. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज वायदे सोन्याची (Gold Futures) किंमतीतही तेजी पाहायला मिळाली आहे. मात्र, चांदीच्या वायदे किंमतीत (Silver Futures) किरकोळ घसरण पाहायला मिळाली आहे.