SPPU | पुणे विद्यापीठाच्या Ph.D. अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर; 22 ऑगस्टला होणार पेट परीक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) पीएच.डी करण्याची संधी मिळावी, म्हणून विविध विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो. पुणे विद्यापीठाने पीएच.डी अभ्यासक्रमांच्या (Ph.d Syllabus) प्रवेशासंदर्भात प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. २२ ऑगस्टला ऑनलाईन ‘पेट परीक्षा’ (Pet exam)  घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना येत्या उद्यापासून ऑनलाइन अर्ज करता येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे (SPPU) उपकुलसचिव उत्तम चव्हाण यांनी दिली.

पीएच.डी (Ph.d) अभ्यासक्रमासाठी विद्यापीठात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन टप्पे पार करावे लागतात. पहिला टप्पा म्हणजे पीएच.डी प्रवेशासाठी होणारी प्रवेश परीक्षा. यामध्ये १०० गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची ही परीक्षा असून ५० गुणांचे प्रश्न ‘रिसर्च मेथडॉलॉजी’वर विचारले जातात तर उर्वरित ५० गुणांसाठी संबंधित विषयावर प्रश्न विचारले जातात. प्रवेश परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात प्रवेश मिळतो येथे त्यांची वैयक्तीक मुलाखत घेतली जाते.

‘पीएच.डी’साठीच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक :

  1. पीएच.डी. प्रवेश परीक्षा : २२ ऑगस्ट २०२१
  2. प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : १२ जुलै.
  3. प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत : ३१ जुलै
  4. ( entrance examination) प्रवेश परीक्षेच्या निकालाची तारीख : २४ ऑगस्ट

प्रवेश परीक्षेचा अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : http://bcud.unipune.ac.in/phd_entrance/applicant/login.aspx

हे देखील वाचा

Mumbai Local Train | प्रसिद्धीसाठी नेत्यांची लोकल बाबत वक्तव्ये; मुंबईकरांमध्ये नाराजीचा सूर

Pimpri Crime | चिखलीमध्ये भरदिवसा कोयत्याने सपासप वार करुन एकाचा निघृण खून

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : SPPU | applications phd admission to the university of pune from july 12

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update