SPPU Chowk-Pune Traffic Police | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक परिसरातील वाहतूक मार्गात 23 डिसेंबरपासून बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – SPPU Chowk-Pune Traffic Police | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे (savitribai phule pune university chowk flyover) काम लवकरच सुरू केले जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी २३ डिसेंबरपासून (गुरूवार) या मार्गावरील वाहतुकीत बदल केले (SPPU Chowk-Pune Traffic Police) आहेत.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातून (SPPU Chowk) पाषाण रस्ता (Pashan Road) मार्गे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय (SP Office Pune) येथून अभिमानश्री ते बाणेर रस्ता (Baner Road), सकारनगर येथून पुन्हा विद्यापीठ चौकाकडे येणारा रस्त्यावर एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे. शिवाजीनगर येथून पुणे विद्यापीठ चौकातून बाणेर आणि पाषाणकडे जाणार्‍या वाहनांनी वरिल मार्गाचा वापर करावा. तसेच पाषाण येथून पुणे विद्यापीठ चौकाकडे येणार्‍या वाहनांनी अभिमानश्री येथून बाणेर रस्ता चौकातून विद्यापीठाकडे जाणार्‍या मार्गाचा वापर करावा. या संपुर्ण एकेरी मार्गावर दोन्ही बाजूला नो पार्किंग राहाणार आहे. (SPPU Chowk-Pune Traffic Police)

गणेशखिंड रस्त्यावरील (ganeshkhind road pune) कॉसमॉस बँक (Cosmos Bank) शेजारून भोसलेनगरमध्ये जाणारा रस्त्यावरही एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. तर भोसलेनगर (Bhosale Nagar) मधून मुख्य गणेशखिंड रस्त्यावर येणार्‍या वाहनांनी रेंजहिल्सच्या रस्त्याचा (range hills road) वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अभिमानश्री येथील बाणेर चौक ते सायकर चौक मार्गावर अवजड वाहनांना सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपयर्र्त प्रवेश बंद करण्यात येणार आहे. तसेच औंध येथील राजीव गांधी ब्रिज (rajiv gandhi bridge aundh) ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस नो पार्किंग आणि नो हॉल्टींग करण्यात आले आहे. उड्डाणपुलाच्या कामासाठी २३ डिसेंबरपासून प्रायोगीक तत्वावर हे बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे (dcp rahul shrirame) यांनी दिली.

 

Web Title :- SPPU Chowk-Pune Traffic Police | Change in Savitribai Phule Pune University Chowk area from 23rd December

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kiara Advani Bold Photo | कियारा अडवाणीचे बोल्ड फोटो पाहून चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो

Maharashtra Omicron variant | महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढण्याचा टास्क फोर्सचा अंदाज; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

Health Department Exam Scam Case | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरण ! बीडच्या BJP पदाधिकाऱ्याला अटक, भाजपच्या गोटात खळबळ