SPPU | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एक पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या पदवीसाठी तीन वर्षांचे बंधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) एक पदवी पूर्ण केल्यावनंतर दुसऱ्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थ्यांनी तीन वर्षांत संबधित पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मुदत घालण्यात आली आहे. तसेच पहिली पदवी किंवा पहिली पदव्युतर पदवी घेतल्यानंतर कमाल चार वर्षात द्वितीय पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यापीठाकडून (SPPU) परिपत्रक जारी करत हे नवीन धोरण कळविण्यात आले आहे.

विद्यापीठ अधिकार मंडळाने विज्ञान, कला, संगणकशास्त्र, गणित, इलेक्ट्रॉनिक्स आदी पदवी अभ्यासक्रमांसाठी हा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि स्वायत्त महाविद्यालये यांनी त्यांच्या प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना द्वितीय पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश देऊ नये, असेही विद्यापीठाने सूचित केले. द्वितीय पदवीसाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना नवीन पीआरएन क्रमांक द्यावा, असेही आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर असे दोन पीआरएन क्रमांक मिळणार आहेत.

कोणत्याही विद्यार्थ्याला पहिली पदवी घेताना श्रेयांक निवड पद्धती (चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टिम)
नसल्यास द्वितीय पदवी निकाल प्रक्रिया टक्केवारी पद्धतीने जाहीर करण्यात यावी.
प्रथम पदवी किंवा प्रथम पदव्युत्तर पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांना संलग्नित महाविद्यालयातून
द्वितीय पदवी किंवा द्वितीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश देता येईल.
या दरम्यान अभ्यासक्रमात काही बदल झाल्यास समकक्षता विद्यार्थ्यांना घ्यावी लागेल.
या विषयांचे मूल्यमापन महाविद्यालय स्तरावरच करण्यात येणार आहे, असेही विद्यापीठाने परिपत्रकात म्हटले आहे.

Web Title :- SPPU | decision of savitribai phule pune university to impose three years requirement for second degree after completion of first degree pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mukta Tilak Funeral Update | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

Hina Khan | केसात गजरा अन् हातावर मेहंदी; हिना खानच्या देशी लूकने चाहत्यांना केले घायाळ

Teacher Recruitment | नववर्षात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी भरती, सरकार एवढ्या जागा भरणार; जाणून घ्या