SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण, मेस कर्मचाऱ्यांकडून धमकी, कुलगुरूंकडे तक्रार करून आंदोलनाचा इशारा (Videos)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (savitribai phule pune university) मेसमध्ये विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आंबट चपात्यांची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केल्याने येथील कर्मचाऱ्यांनी बघुन घेण्याची धमकी विद्यार्थ्यांना दिल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. यासंबंधीची तक्रार विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे करण्यात आली असून ताबडतोब कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.(SPPU News)

विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या धमकीबाबत तसेच निकृष्ट जेवणाची तक्रार विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने कुलगुरूंकडे केली आहे. समितीचे राहुल ससाणे, रोहित भामरे, बालाजी मिसाळ, मयुर जावळे, विशाल झांझरे यांच्या सहीचे निवेदन कुलगुरूंना देण्यात आले आहे.

कुलगुरूंना देण्यात आलेल्या निवेदनात समितीने म्हटले आहे की, आज दिनांक २२ एप्रिल २०२४ रोजी आपल्या विद्यापीठाच्या रिफेक्ट्रीमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले गेले. चौकशीअंती निष्पन्न झाले की, चपात्याचे पिठ हे खराब झालेले होते. त्यामुळे सर्व चपात्या आंबट लागत होत्या. यासंबंधीचीच्या अनेक तक्रारी विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या आहेत.

उपस्थित विद्यार्थ्यांनी मेस चालक व मेस कर्मचारी यांना निकृष्ट जेवणासंदर्भात विचारणा केली व असे निकृष्ट जेवण विद्यार्थ्यांना देऊ नका विद्यार्थ्यांना विषबाधा होऊ शकते, अशी विनंती केली असता संबंधित कर्मचाऱ्यांनी एका विद्यार्थ्यांस पाहून घेण्याची धमकी दिली. मी लोकलचा आहे, अशा पद्धतीची भाषा विद्यार्थ्याला वापरली गेली.

कर्मचाऱ्यांनी हायजेनची काळजी घेण्याऐवजी, तसेच विद्यार्थ्यांना उत्तम व पौष्टिक अन्न देण्याऐवजी उलट कर्मचारी विद्यार्थ्यांना पाहून घेण्याची धमकी देत असतील तर ही अत्यंत निंदनीय बाब आहे. आमची विद्यापीठ प्रशासनाला विनंती आहे की, संबंधित मेस चालक व कर्मचारी यांच्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई करावी.

विद्यापीठ प्रशासनाला इशारा देताना समितीने निवेदनात पुढे म्हटले आहे की, जर निकृष्ट अन्न खाऊन एखाद्या विद्यार्थ्यांला विषबाधा झाली किंवा कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्याला मारहाण झाली तर त्याला सर्वस्वी जबाबदार तो कर्मचारी, मेसचालक व विद्यापीठ प्रशासन राहील. विदयार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम कोणी करत असेल आणि त्यांना धमकी देण्याचे काम कोणी करत असेल तर आम्ही त्याचे उत्तर तीव्र आंदोलनाने देऊ.

दोन दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठामध्ये ४० विद्याथ्र्यांना विश्वासा झाल्याचे घटना घडलेली आहे आपल्या विद्यापीठात अशा पद्धतीची घटना घडू नये यासाठी आपण सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे, असे निवेदनात म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe | असा पोरकटपणा दाखवाल, तर लक्षात ठेवा गद्दारीचा विजय कधीच होत नाही, पुरावे माझ्याकडेही, अमोल कोल्हेंचा विरोधकांना इशारा

Swargate Pune Police | व्होडाफोन कंपनीतून चोरलेला 54 लाखांचा मुद्देमाल परराज्यातून जप्त, स्वारगेट पोलिसांची कामगिरी

Pune Fraud Case | पुणे: आर्मी मध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक, आरोपीला जामीन मंजूर

Hadapsar Pune Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, लग्नास नकार दिल्याने तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

ACB Trap Case | पाच हजार रुपये लाच घेताना पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Aaditya Thackeray In Maval Lok Sabha | आदित्य ठाकरे आज मावळमध्ये, संजोग वाघेरे भरणार उमेदवारी अर्ज, म्हणाले ”महागाईने त्रस्त जनता…”