SPPU News | विद्यापीठ ग्रंथालयातील तात्पुरत्या सदस्यत्व सेवेचा विस्तार होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) जयकर ज्ञानस्त्रोत केंद्रात संशोधक व बाहेरील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या तात्पुरत्या सदस्यत्वाच्या सेवेमध्ये विस्तार होणार आहे. या सेवेचा कालावधी एक दिवस ते एक वर्षापर्यंत वाढवण्यात यावा, अशी शिफारस जयकर ज्ञानस्त्रोत समीतीने मा. कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केली होती. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून लवकरच हा कालावधी वाढवण्यात येणार आहे. सध्या हा कालावधी १ ते ८ दिवसांपर्यंतच मर्यादित असून ही सुविधा सशुल्क व नियमांच्या अधिन सुरळीत सुरू आहे.(SPPU News)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ज्ञानस्त्रोत केंद्रात पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यातील अनेक संशोधक विद्यार्थी संशोधनासाठी संदर्भ शोधण्यासाठी व आवश्यक साहित्य मिळविण्यासाठी येत असतात. या विद्यार्थ्यांना केंद्रातर्फे सशुल्क तात्पुरते सदस्यत्व देण्यात येते. या सदस्यत्वाचा सध्याचा कालावधी हा जास्तीत जास्त ८ दिवसांचा आहे. मात्र आता वेगवेगळ्या आवश्यकतेनुसार या सदस्यत्वाचा कालावधी विस्तारीत करण्याची शिफारस केंद्रातर्फे करण्यात आली होती. या शिफारसीनुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार १, ८, १५ दिवस, १, ३, ६ महिने तसेच १ वर्षापर्यंत हे सदस्यत्व घेता येईल. मा. कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जयकर ज्ञानस्त्रोत समीतीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून केंद्रातर्फे लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालिका डॉ. अपर्णा राजेंद्र यांनी दिली.

कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जयकर ज्ञानस्त्रोत समीतीच्या बैठकीत ग्रंथालयाच्या संबंधित अनेक समस्यांचा
आढावा घेत चर्चा करण्यात आली. यांमध्ये मा. कुलगुरू यांनी अनेक सुधारणा सुचवित या तात्पुरत्या सदसत्व सेवेचा
विस्तार करण्याची मान्याता दिली आहे. त्याची ग्रंथालयामार्फत लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

प्रा.(डॉ) विजय खरे
प्रभारी कुलसचिव

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sunanda Pawar On Baramati Lok Sabha | बारामतीत शेवटच्या दोन दिवसात धनशक्तीचा वापर होईल, सुनंदा पवार यांचा मोठा दावा

Devendra Fadnavis On Sharad Pawar NCP | राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावरून फडणवीसांची पवारांवर टीका, 542 पैकी 10 जागा लढवणाऱ्यांच्या आश्वासनांवर विश्वास कोण ठेवणार

Ajit Pawar Break Traffic Rules In Pune | पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तोडले वाहतुकीचे नियम, ताफा उलट्या दिशेने सुसाट, वाहतूक पोलिसांची बघ्याची भूमिका (Video)

Ravindra Dhangekar On BJP | भाजपचाच देशभरातील महिलांच्या ‘मंगळसूत्रा’वर डोळा ! काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे भाजपवर टीकास्त्र