‘कोरोना’ रोखण्यासाठी वाळकी गावात औषधांची ‘फवारणी’

वाळकी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना या साथीच्या रोगाचा विषाणू संसर्ग वाळकी गावात पसरू नये म्हणून दौड तालुक्यातील वाळकी ग्रामपंचायतीतर्फे औषधे फवारून साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव कमी केला जात आहे, नुकतीच गावातील थोरात माळा, म्हसोबा वाडी, पिराची वाडी या वस्त्यांवर फवारणी करण्यात आली . तसेच ग्रामीण भागात पोलिस बंदोबस्त कमी पडत असल्यामुळे गावचे पोलीस पाटील यांच्यामार्फत लोकांना घरी बसण्याचे आवाहन करित आहेत.

पुणे, मुंबई शहरांमधून वाळकी गावाकडे येणारांची संख्या जास्त आहे, प्रत्येकजण कोरोनाच्या भीतीने गावाकडे येत आहे. गावाकडे या रोगाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून आरोग्य केंद्रावर तपासूनच गावात प्रवेश करावा आहे असे आवाहन वाळकी ग्रामपंचाकरण्यात येत आहे तसेच आरोग्य केंद्राचे कर्मचारी शहरातून अलेल्यांच्या घरी जावून आरोग्य केंद्रात जावून तपासणी करण्याची विनंती करत आहेत.