खळबळजनक ! भारताच्या ‘या’ महिला धावपटूने केला ‘समलैंगिक’ असल्याचा खुलासा ; क्रिडा क्षेत्रात प्रचंड खळबळ

ओडिशा : वृत्तसंस्था – भारताची जलद धावपटू द्युती चंदने प्रेमसंबंधाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. आपण समलैंगिक असून ओडिशातील एका मैत्रीणीशी प्रेमसंबंध आहेत. सर्वोच्च न्यायलयानेही ३७७ कलमाबद्दल दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर मला हे बोलण्याचे धाडस मिळाले आहे. अशी माहिती द्युतीनं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. मात्र तिने त्या मैत्रिणीची ओळख उघड करण्यास नकार दिला आहे.

आपण समलैंगिक असल्याची जाहीर कबुली देताना द्युती चंद म्हणाली की, ‘समलैंगिक असलेल्यांना मी नेहमी पाठींबा दिला आहे आणि ही वैयक्तीक निवड आहे. सर्वोच्च न्यायलयानेही ३७७ कलमाबद्दल दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर मला हे बोलण्याचे धाडस मिळाले आहे. खेळाडू म्हणून माझ्या कामगिरीवर शंका उपस्थिक करण्याचा कोणालाही अधिकार नाही. समलैंगिक संबंध ठेवणे हा माझा वैयक्तीक निर्णय आहे आणि त्याचा आदर करायला हवा. आपल्या ‘मला समजून घेणारा जीवनसाथी मिळाला आहे. आपल्याला कोणासोबत आयुष्य घालवायचे आहे, याचे स्वातंत्र्य सर्वांना मिळायला हवं.’ विशेष म्हणजे भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच सार्वजनिकरित्या समलैंगिक असल्याचा दावा केला आहे.

द्युतीचा मैदानाबाहरचा संघर्ष –

२०१४ मध्ये ग्लासगोतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती. मात्र वैद्यकीय चाचणीच्या अहवालानुसार, तिला भारतीय संघातून वगळण्यात आले. टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण पुरुषपातळीएवढे असल्याचे कारण देत तिच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली होती. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकपासून महिला अ‍ॅथलिटसाठी ‘हायपर अ‍ॅण्ड्रोजेनिझम’ ही चाचणी लागू केली होती. या चाचणीची द्युती चंद बळी ठरली. मात्र दुर्दैवाने तिच्या पाठीशी कोणी उभं राहील नाही. त्यावेळी कोलकात्याच्या ‘जेंडर व्हेरिफिकेशन टेस्ट’च्या अभ्यासक ‘पायोश्नी मित्रा’ या तिच्या मदतीला धावून आल्या. द्युतीने हायपर अ‍ॅण्ड्रोनिझम धोरणालाच ‘कॅस’मध्ये (खेळांचे सुप्रीम कोर्ट) आव्हान दिले. ‘कॅस’ने हे मान्य केले, की महिला खेळाडूंत टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण पुरुषपातळीएवढे असले तरी, त्यामुळे त्या महिला खेळाडूला फायदा होऊ शकतो हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध होऊ शकलेले नाही. त्यामुळे ‘कॅस’ने ‘हायपर अ‍ॅण्ड्रोनिझम’ची चाचणीच दोन वर्षांपर्यंत स्थगित केली. द्युतीच्या लढ्यामुळे जगातील सर्वच महिला अ‍ॅथलिटना या निर्णयाचा फायदा मिळाला.

त्यांनतर चार वर्षांच्या बंदीनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कमबॅक करत भारताच्या द्युती चंदने आशियाई स्पर्धेत १०० व २०० मीटर शर्यतीत भारताला रौप्यपदक जिंकून दिले. पी. टी. उषा यांच्यानंतर एकाच आशियाई स्पर्धेत १०० व २०० मीटर शर्यतीत पदक जिंकण्याचा मान द्युतीने पटकावला.

You might also like