Spruha Joshi | स्पृहाच्या लाल रंगाच्या साडीतल्या फोटोने केले चाहत्यांना घायाळ; साडीत दिसतेय खास

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री बरोबरच कवयित्री म्हणून नाव कमावणारी स्पृहा जोशी (Spruha Joshi) आज सर्वांनाच ठाऊक आहे. स्पृहा अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. स्पृहाने ‘अग्निहोत्र’, ‘आभाळमाया’, ‘उंच माझा झोका’ या मालिकेमध्ये आपल्या अभिनयाचे ठसे उमटवले होते. आता स्पृहाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्पृहा (Spruha Joshi) लवकरच पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर परतणार आहे.

स्पृहा जोशी बऱ्याच काळाने पुन्हा टेलिव्हिजनवर परतली आहे. लोकमान्य या मालिकेत स्पृहा टिळकांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. स्पृहा आता पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिने नुकतेच तिचे काही फोटोज इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत. जे सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोमध्ये स्पृहाने लाल रंगाची साडी परिधान केली असून हेवी एरिंग आणि बन हेअर स्टाईल केला आहे. या फोटोत स्पृहा खूपच सुंदर दिसत आहे. सध्या स्पृहाच्या या फोटोला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे.

स्पृहाने (Spruha Joshi) शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती खूपच सुंदर आणि सोज्वळ दिसत आहे. स्पृहा तिच्या अँकरिंग साठी ही प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर स्पृहा नेहमीच सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. हे फोटो शेअर करताना स्पृहाने लिहिले की “आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या असतात”. सध्या स्पृहाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

 

Web Title :- Spruha Joshi | television spruha joshi shared new look in red saree see her photos here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | निवडणुक आयोगातील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Nandurbar ACB Trap | दहावीचे मार्कशीट देण्यासाठी विद्यार्थ्याकडून लाच घेताना मुख्याध्यापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Shehnaaz Kaur Gill | अभिनेत्री शहनाज गिलच्या विंटर लूकने चाहते थक्क; शेअर केले खास लूकमधील फोटो