पुण्यातील ‘या’ हॉस्पीटलमध्ये स्पुटनिकची लस उपलब्ध; पहिल्या डोसनंतर दुसरा फक्त 21 दिवसानंतर, जाणून घ्या किंमत

पुणे : देशात कोरोना प्रतिबंधक लस म्हणून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसींचा वापर करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी फायझर ही लस देशात उपलब्ध झाली असतानाच आता रशियन बनावटीची स्पुटनिक ही लसही उपलब्ध झाली आहे. पुण्यातही स्पुटनिक लस (Sputnik vaccine) उपलब्ध झाली आहे.

पुण्यातील गॅलॅक्सी केअर हॉस्पिटलमध्ये स्पुटनिक लशीचा राज्यातील पहिला डोस देण्यात येणार असून सोमवारपासून पुणेकरांसाठी ही लस उपलब्ध होणार आहे. ही लस घेण्यासाठीही काेविन ॲपवरून किंवा पोर्टलवरून नाावनोंदणी करणे आवश्यक आहे.

यासंदर्भात बोलताना गॅलॅक्सी केअर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर म्हणाले, राज्यातील पहिली स्पुटनिकची लस पुण्यातील ३६ वर्षांच्या नागरिकाने घेतली आहे.

या लशीचे ६०० डोस आले असून बुधवारपासून त्याचे लसीकरण सुरु झाले. पहिल्या टप्प्यात डॉ.
रेड्डी लॅबच्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. त्यानंतर सोमवारपासून ती पुणेकरांना मिळेल.
कोविशील्ड प्रमाणेच याही लशीचे दोन डोस आहेत. मात्र दुसरा डोस २१ दिवसानंतर घ्यावा लागणार
आहे. स्पुटनिक लस घेण्यासाठी एक हजार १४५ रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याचेही त्यांनी
सांगितले.

हे देखील वाचा

Pune Corona Lockdown | पुणेकरांना Lockdown मधून सूट नाही, निर्बंधाची स्थिती सोमवारपासून जैसे थेच राहणार

कोरोनाची तिसरी लाट आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत शास्त्रांनी सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट

Honey Trap | Facebook द्वारे सेक्स चॅट अन् न्यूड व्हिडीओ कॉल, हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा धोका वाढला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Sputnik vaccine available at Galaxy Care Hospital in Pune, second only 21 days after first dose, find out the price

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update