खुलासा ! चीन ‘कोरोना’वरील लस बनवण्यात आणतोय ‘बाधा’, ‘या’ 5 बड्या देशांच्या गुप्तचर यंत्रणांनी सांगितलं

बीजिंग : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला असून चीनवर बरेच आरोप होत आहेत. हा व्हायरस चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाला होता आणि नंतर एका चुकीमुळे तो लीक झाला असा दावा कला जात आहे. त्याशिवाय चीनने त्यावेळी संसर्गाची योग्य माहिती दिली नसल्याने परिस्थीत गंभीर झाली असा आरोप अमेरिकेने चीनवर केला आहे. यानंतर आता ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंड या देशांच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधीत हेरांनी असा दावा केला आहे की, कोरोनावर लस बनवण्यात चीन सतत अडथळा निर्माण करत आहे.

एका रिपोर्टनुसार, या पाच देशांच्या गुप्तचर यंत्रणांनी संयुक्तपणे 15 पानांचे डिसियर तयार केले आहे. त्यानुसार,जगाला कोरोना विषाणूची लस लवकरात लवकर मिळावी अशी चीनची इच्छाच नाही. या क्रमवारीत चीनने अनेक देश आणि स्वतंत्र वैज्ञानिक संस्थांना कोरोनाचे थेट नमुने देण्यास नकार दिला आहे. असा दावा केला जात आहे की, या डोजिअरच्या जोरावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत चिनवर आरोप करत आहेत.

अहवालात काय दावा केला आहे ?
1. कोरोनाचा संसर्ग मनुष्यापासून मनुष्यामध्ये पसरला आहे हे चीन सतत नकार देत आहे. परंतु चिनला बऱ्याच काळापासून याची जाणीव असल्याचे पक्के पुरावे मिळाले आहेत. कोरोना संसर्गामुळे युरोप आणि अमेरिकेत मोठा विनाश झाला आहे हे चिनने मान्य केले आहे. चीनमध्ये कोरोना विषाणू आणि त्याच्या धोक्याबद्दल माहिती देऊ इच्छित असलेले कोणत्याही डॉक्टर किंवा पत्रकार अचानक बेपत्ता झाले आहेत.

१. कोरोनाचा संसर्ग मनुष्यापासून मानवांमध्ये पसरला आहे हे चीन सतत नकार देत आहे, परंतु पुष्कळ काळापासून याची जाणीव असल्याचा ठाम पुरावा मिळाला आहे. कोरोना संसर्गामुळे युरोप आणि अमेरिकेत मोठा विनाश झाला आहे हे चीनने मान्य केले.

2. चीनमध्ये कोरोना विषाणू आणि त्याच्या धोकेबद्दल माहिती देऊ इच्छित असलेले कोणतेही डॉक्टर किंवा पत्रकार अनपेक्षितपणे गायब झाले.

3. वुहानमधील प्रयोगशाळेत वटवाघूळामध्ये सापडलेल्या हानिकारक विषाणूविषयी संशोधन सुरु होते याचे पक्के पुरावे मिळाले आहेत. या प्रयोगशाळेत संशोधन सुरु असताना कोणत्याही सुरक्षा साधनांचा वापर करण्यात आला नव्हता. याचे काही फोटो समोर आली असून ते फोटो चीनने कढून टाकली आहेत.

4. चीनने ही प्रयोगशाळाच नष्ट केली नाही तर या प्रयोगशाळेत काम करणाऱ्या लोकांना देखील गायब केले आहे.

5. चीन जगभराताली शास्त्रज्ञांना कोरोना विषाणूचे थेट नमुने पाठवण्यास सतत नकार देत आहे. त्यामुळे लस तयार करण्याची गती मंदावली आहे.

6. चीनने संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात कठोरपणे आपल्या देशात प्रवास बंदी लागू केली. परंतु इतर देशांना सांगताना सांगितले की ही केवळ खबरदारी आहे. प्रत्येकाने तसे करण्याची गरज नाही.
या अहवालात असेही म्हटले आहे की, बिजिंगला डिसेंबरमध्ये विषाणूची पूर्ण माहिती होती. परंतु 31 डिसेंबरला त्यांनी अधिकृतपणे जाहीर केले. हा विषाणू मासणाकडून माणसामध्ये पसरतो हे सांगण्यास चीनने आणखी 20 दिवस लावले.तोपर्यंत या विषाणूची वुहानमध्ये 25 हजाराहून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली. चीनच्या अधिकृत कागदपत्रावरून असे दिसून आले आहे की, 23 जानेवारीपासून काही लाख लोक वुहान ते जगातील कित्येक देशांमध्ये केले होते. त्यानंतर कोरोना संसर्गाची नोंद सुरु झाली. या व्यतिरिक्त कोरोनाविषयी माहिती देणाऱ्या डॉक्टर बेपत्ता झाले. याची देखील माहिती चीन सरकारने लपवून ठेवले. यावर चिनने कोणतीच प्रतिक्रीया दिली नाही.