आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघातून खेळायला आवडेल : श्रीसंत

पोलिसनामा ऑनलाईन टीम – स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलेला क्रिकेटपटू एस श्रीसंतला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता तब्बल सात वर्षानंतर तो क्रिकेटच्या मैदानावर परतण्यास सज्ज झाला आहे. त्यामुळे मला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळायला आवडेल असे त्याने सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतची बाजू ऐकून घेऊन त्यावर 3 महिन्याच्या आत पुनर्विचार करण्याचे आदेश बीसीसीआयला 15 मार्च 2019 रोजी दिले होते. त्यानंतर लोकपाल डी. के. जैन हे श्रीसंतबद्दल निर्णय घेतील असा निर्णय घेतला होता. त्यानुसार 20 ऑगस्ट 2019 ला श्रीसंतवरील आजीवन बंदी हटवण्यात आली असून 2020 मध्ये त्याला क्रिकेटच्या मैदानावर परतता येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार केरळच्या रणजी संघात श्रीसंतला समाविष्ट करून घेण्याचा निर्णय राज्य क्रिकेट संघटनेने घेतला आहे.

यासोबतच श्रीसंत खझङ खेळण्याबद्दलही सकारात्मक आहे. खझङ च्या पुढच्या वर्षीच्या हंगामासाठी मी नक्की माझे नाव देईन असे श्रीसंतने सांगितले आहे. मला मुंबई इंडियन्स संघाकडून खेळायला आवडेल. त्याचे कारण आहे सचिन तेंडुलकर. मी मुळात क्रिकेट खेळायला सुरुवात केली, त्याचे कारण मला सचिनला भेटायचे होते. त्यांच्याकडून ड्रेसिंग रूममध्ये देखील खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यामुळे मला संधी मिळाली तर मी मुंबई इंडियन्सचे नाव घेईन. त्याशिवाय मला धोनीच्या नेतृत्वाखाली किंवा बंगळुरू संघातूनही खेळायला आवडेल, असे तो म्हणाला.