SRH vs RCB : STATS : मॅचमध्ये बनले 9 रेकॉर्ड, आरसीबीने पराभवासह बनवले अनेक लाजिरवाणे रेकॉर्ड

नवी दिल्ली : सनरायझर्स हैद्राबादच्या टीमने आयपीएल 2020 च्या एलिमीनेटर सामन्यात आरसीबीच्या टीमला 6 विकेटने पराभूत केले. पहिल्यांदा फलंदाजी करत आरसीबीच्या टीमने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेटच्या गमावून 131 धावांचा स्कोअर उभारला होता. हे लक्ष्य सनरायझर्स हैद्राबादच्या टीमने 19.4 ओव्हर 4 विकेट गमावून प्राप्त केले.

या मॅचमध्ये दोन्ही टीमच्या खेळाडूंनी अनेक शानदार आणि आश्चर्यकारक रेकॉर्ड बनवले आहेत. या रेकॉर्डबाबत जाणून घेवूयात…

मॅचमधील रेकॉर्डवर एक नजर :

1. सनरायझर्स हैद्राबादचा आरसीबीच्याविरूद्ध हा 10 वा विजय होता. यापूर्वी या दोन्ही टीममध्ये एकुण 17 मॅच खेळण्यात आल्या होत्या. ज्यापैकी 9 मॅच सनरायझर्स हैद्राबादच्या टीमने जिंकल्या होत्या. तर 7 मॅच आरसीबी टीमने जिंकल्या होत्या.

2. आयपीएल 2020 च्या टूर्नामेंटमधून बाहेर पडणारी आरसीबी पाचवी टीम बनली आहे. पंजाब, चेन्नई, राजस्थान आणि केकेआर अगोदरच टूर्नामेंटच्या बाहेर गेले आहेत.

3. सनरायझर्स हैद्राबादची हा आयपीएल 2020 मध्ये 8 वा विजय होता. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सनंतर ती या सीझनमध्ये 8 मॅच जिंकणारी तिसरी टीम बनली आहे.

4. एबी डीव्हिलियर्सने आज आपल्या आयपीएल करियरचे 38वे अर्धशतक बनवले. हे त्याच्या या सीझनचे पाचवे अर्धशतक आहे.

5. डेव्हिड वॉर्नरने आज 17 चेंडूंचा सामना केला. हा आयपीएल 2020मध्ये केएल राहुल नंतर 400 चेंडूचा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.

6. केन विलियम्सनने आज आपल्या आयपीएल करियरचे 14वे अर्धशतक केले.

7. लागोपाठ 13व्या सीझनमध्ये आरसीबीच्या टीमला ट्रॉफीशिवाय आयपीएलच्या बाहेर जावे लागले.

8. आरसीबीचा हा आयपीएल 2020 मध्ये लागोपाठचा 5वा पराभव होता. या मॅचपूर्वी सुद्धा त्यांना लीग स्टेजच्या 4 मॅचेसमध्ये लागोपाठ पराभवाचा सामना करावा लागला होता.

9. सनरायझर्स हैद्राबादचा हा टूर्नामेंटमध्ये लागोपाठ चौथा विजय होता. या मॅचपूर्वी हैद्राबादने लागोपाठ 3 मॅच जिंकल्या होत्या.