श्रीलंका स्फोटातील हल्लेखोराचा व्हिडीओ व्हायरल ; इस्लामिक स्टेटने स्वीकारली जबाबदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रविवारी २१ तारखेला ऐन इस्टर संडे दिवशी श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटाने हादरली. श्रीलंकेत या दिवशी तब्बल ८ साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. हा विनाशकारी हल्ला करणाऱ्या सुसाईड बॉम्बरचा व्हिडीओ समोर आला आहे. याबाबतचे वृत्त आणि व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

काय आहे व्हिडीओ

एक तरुण खांद्यावर बॅग घेऊन चर्च परिसरात पोहचला. यावेळी रस्ता क्रॉस करणाऱ्या एका इसमाला त्याने काहीतरी विचारकल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर हा तरुण खांद्यावर बॅग घेऊन चर्चमध्ये पोहचला. त्याच्या हातात स्फोट घडवण्यासाठी रिमोट होता. चर्चमध्ये पोहचल्यानंतर काही वेळाने त्याने स्फोट घडवून आणला. एकूण आठ साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले त्यापैकी एका चर्चमधील बॉम्बरचा व्हिडीओ समोर आला आहे. श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटात ३०० हुन अधिक जणांचा बळी गेला तर ५०० हून जास्त लोक जखमी झाले आहे.

इस्लामिक स्टेटने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

श्रीलंकेची राजधानी कोलंबो आणि नजिकच्या परिसरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने स्वीकारली आहे.