श्रीलंकेत दहशतवादी हल्यानंतर कापड बांधण्यास बंदी

कोलंबो : पोलिसनामा ऑनलाईन – चेहरा झाकणाऱ्या कोणत्याही गोष्टीमुळे व्यक्तीची ओळख पटण्यास काहीही अडचणी येऊ नयेत म्हणून सोमवारपासून संपूर्ण चेहरा कपड्याने झाकण्यावर बंदी घालण्याचा निर्णय श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी घेतला आहे.

सणाच्या वेळी चर्च व आलिशान ह़ॉटेलांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून श्रीलंकेत कापड बांधण्यास बंदी घालण्यात आली आहे. २१ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३५९ जणांनी प्राण गमावले. त्याचबरोबर ५०० नागरिक जखमी झाले होते. याची काळजी घेत सोमवारपासून बंदी घालण्यात आली आहे. देशाच्या सुरक्षतेसाठी हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

श्रीलंकेत शुक्रवारी झालेल्या चकमकीत १५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यामध्ये बॉम्बस्फोटांची जबाबदारी ISIS ने घेतली. त्यानंतर सरकारने या नव्या कठोर बदलांची मागणी केली होती. अखेर त्यावर निर्णय घेत बुरखा आणि चेहऱ्यावर कपडा बांधण्यावर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले.

बॉंम्बस्फोटामध्ये सुत्रधाराच्या वडिल आणि दोन भावांचाही मृत्यू झाला. रॉयटर्सने पोलिसांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी झालेल्या स्फोटामध्ये जेनी हाशीम, रिलवान हाशीम आणि सुत्रधाराचे वडिल मोहम्मद हाशीन हे मारले गेले. यां तिघांचा काही दिवसांपुर्वी व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये स्थानिकांविरोधात बोलत असल्याचे दिसत आहे. या बॉम्बस्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेटने घेतली आहे.