‘या’ देशात राष्ट्रवाद सिद्ध करण्यासाठी मुसलमानांनी तोडली मस्जिद !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – श्रीलंकेत ईस्टर संडेला झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात श्रीलंका हादरुन गेली, मात्र चर्चला निशाणा बनवण्यात आल्यानंतर श्रीलंकेत मुसलमान लोकांविरोधात दंगली देखील उसळल्या. या दहशतवादी हल्लानंतर मुसलमानांविरोधात दवेषाचे वातावरण श्रीलंकेत निर्माण झाले आहे. जे शांत होण्याचे नाव घेताना दिसत नाही. या हमल्यात एका मुस्लिम कट्टरपंथी असलेल्या नॅशनल तौहीद जमात या संघटनेवर शंका उपस्थित केली जात आहे. तर मुस्लिम समाजाला श्रीलंकेत संशयाने पाहिजे जात आहे.

आपल्यावर उचलल्या जात असलेल्या प्रश्नांमुळे ती शंका मिटवली जावी म्हणून मदतुंगामामध्ये मुस्लिम समुदायांने नॅशल तौहीद जमातची एक मस्जिद स्वत: नष्ट केली. मस्जिदीचे प्रमुख अकबर खान यांनी सांगितले की, विदेशी संघटनांकडून फंड येत असल्याने मस्जिदवर प्रश्न उपस्थित केले जात होते. असे म्हणले जाते की या मस्जिदीचा वापर प्रतिबंधित चरमपंथी संघटन तौहीद जमात च्या सदस्यांकडून करण्यात येत होता.

देशातील परिस्थितीचा विचार करता मस्जिद प्रशासन कमिटीेने निर्णय घेतला की, गावात दुसरी मस्जिद राहणार नाही. या मस्जिदच्या ती शिलापट्टी देखील तोडण्यात आली, ज्यावर अरबी अक्षरात निर्मात्यांची नावे लिहण्यात आली होती. गावातील लोकांचे म्हणणे आहे की त्याचे सिंहलींशी (मूळ श्रीलंकावासी) पुर्वीपासून चांगले संबंध आहेत. त्यामुळे कोणताही वाद नको यासाठी या ठिकाणच्या मुस्लिम समुदायांने एकामताने एकमेकांना विश्वासात घेत मस्जिद तोडण्याचा निर्णय घेतला.

आरोग्यविषयक वृत्त –

केसांच्या समस्या समूळ नष्ट करा ; ‘हे’ आहेत उपाय

हे दोन पदार्थ टाळा ; अन्यथा ‘स्नायू’ होतील कमजोर

डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी ; ‘ह्या’ सात सोप्या पद्धती

अंघोळ करताना तुम्ही ‘या’ चूका तर करत नाही ना ?