लसिथ मलिंगापाठोपाठ श्रीलंकेच्या ‘या’ प्रमुख खेळाडूची निवृत्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. बांगलादेशविरुद्ध २६ जुलै रोजी होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर मलिंगा क्रिकेटला गुडबाय करणार आहे. मलिंगाचा समावेश बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांसाठी करण्यात आला आहे. श्रीलंका या मालिकेत तीन एकदिवसीय सामने खेळणार असून पहिल्या सामन्यानंतर मलिंगा निवृत्त होणार आहे. आर प्रेमदासा स्‍टेडियम वर खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात मलिंगा निवृत्ती स्वीकारणार आहे.

त्यानंतर आज आणखी एका वेगवान गोलंदाजाने निवृत्तीची घोषणा केली आहे. नुवान कुलसेकराने आज निवृत्तीची घोषणा केली आहे. कुलसेकर याने श्रीलंकेसाठी २१ कसोटी, १८४ एकदिवसीय सामने आणि ५८ टी-२० सामने खेळले आहेत. २१ कसोटी सामन्यात त्याने ४८ विकेट घेतल्या आहेत तर १८४ एकदिवसीय सामन्यात १९९ विकेट घेतल्या आहेत तर ५८ टी-२० सामन्यात ६६ विकेट घेतल्या आहेत.

मागील दोन वर्षांपासून तो श्रीलंकेसाठी आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्याने २१७ मध्ये शेवटचा सामना खेळला होता. २००३ मध्ये त्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मागील १५ वर्ष तो श्रीलंकेसाठी महत्वाचा गोलंदाज म्हणून भूमिका पार पाडत होता. २०११ मधील वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात त्याच्या गोलंदाजीवर धोनीने मारलेला विजयी षटकार आजही भारतीयांच्या मनात घर करून आहे.

दरम्यान, कुलसेकर याने निवृत्ती घेताना निरोपाचा सामना खेळू देण्याची विनंती केली होती मात्र राष्ट्रीय निवड समितीने त्याची हि विनंती फेटाळून लावत अनेक वर्ष स्थानिक स्पर्धांत न खेळण्याने त्याला हा सामना देऊ शकत नसल्याचे कारण त्यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –