न्यूझीलंडच्या टीम साऊथीने मोडला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ खास रेकॉर्ड !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथी हा त्याच्या वेगवान आणि स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र त्याने फलंदाजीत देखील कमाल दाखवली असून त्याने भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

साऊथीने काल श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात १४ चेंडूवर १९ धावा केल्या. त्याने श्रीलंकेच्या धनंजय डिसिल्वाच्या गोलंदाजीवर षटकार खेचत सचिन तेंडुलकर याच्या षटकारांशी बरोबरी केली. त्याने आतापर्यंत कसोटीमध्ये ६९ षटकार मारले असून या षटकाराबरोबरच त्याने सचिन तेंडुलकर याच्या षटकारांशी देखील बरोबरी केली. सचिन तेंडुलकरचा हा रेकॉर्ड मोडण्यासाठी त्याला आता फक्त एका षटकाराची आवश्यकता आहे.

सचिन तेंडुलकर याने २०० कसोटी सामन्यातील ३२९ डावांमध्ये ६९ षटकार मारले होते. तर साऊथी याने केवळ ६६ सामन्यातील ९६ डावांमध्ये हा पराक्रम केला आहे. गोलंदाजीप्रमाणेच तो उत्तम फलंदाजी देखील करू शकतो.त्याने आतापर्यंत ६६ कसोटी सामन्यांत १५६४ धावा केल्या असून यामध्ये ५ अर्धशतकांचा समावेश आहे. ७७ धावा हि त्याची सर्वोत्कृष्ट खेळी असून त्यामध्ये त्याने ९ षटकार ठोकले होते.

सर्वाधिक षटकार ब्रॅंडन मॅक्क्युलमच्या नावे
कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा पराक्रम हा ब्रॅंडन मॅक्क्युलमच्या नावावर असून त्याने १७६ कसोटी डावांत १०७ षटकार खेचले आहेत. त्यानंतर अ‍ॅडम गिलख्रिस्ट याने १०० तर ख्रिस गेल याने ८९ षटकार खेचले आहेत. भारतासाठी वीरेंद्र सेहवाग याने १०४ कसोटी सामन्यांत ९१ षटकार खेचले आहेत. त्यानंतर धोनीने ७८ षटकार खेचले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –