BCCI च्या मदतीसाठी धावले शेजारी राष्ट्र, IPLच्या उर्वरीत सामन्याच्या आयोजनाची श्रीलंकेने दशर्वली तयारी

पोलीसनामा ऑनलाइनः देशातील वाढत्या कोरोनामुळे IPL चा यंदाचा मोसम स्थगित करण्यात आला आहे. आता IPL चे उर्वरीत सामने यंदाच्या टी-20 विश्वचषकानंतर घेण्याचा BCCI चा मानस आहे. उर्वरीत सामने यूएईत होतील, अशा चर्चा सुरु असतानाच आता शेजारील श्रीलंका देखील BCCI च्या मदतीसाठी धावला आहे. आयपीएल 2021 चे उर्वरीत सामने आयोजनाची तयारी श्रीलंकेने दर्शवली आहे. श्रीलंकेने यापूर्वी 2020 मध्येही आयपीएल आयोजित करण्यासाठी बीसीसीआयला प्रस्ताव दिला होता.

सूत्रांच्या माहितीनुसार, यूएई पुन्हा एकदा BCCI च्या उर्वरित सामन्यांसाठी पसंतीचे स्थळ म्हणून समोर येत आहे, मात्र श्रीलंकादेखील या शर्यतीत आहे. श्रीलंका क्रिकेट व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रोफेसर अर्जुन डी सिल्वा यांनी IPL चे उर्वरित सामने सप्टेंबरमध्ये श्रीलंकेत व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, लंका प्रीमिअर लीगसाठी आम्ही ग्राऊंडस अन् सुविधा तयार केल्या आहेत. जुलै ऑगस्टमध्ये लंका प्रीमिअर लीगचे आयोजन केले जाईल. त्यानंतर सप्टेंबरमध्ये आम्ही IPL च्या आयोजनासाठी तयार आहोत. मात्र श्रीलंकेा क्रिकेटने बीसीसीआयला त्यांच्या मैदानांच्या उपलब्धतेबद्दल अधिकृतपणे माहिती दिली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. श्रीलंकेकडे कोलंबो, पॅलेकेल, सूर्यावेवा आणि डम्बुला अशी चार मैदाने आहेत. पहिल्या 3 ठिकाणी आयसीसीच्या पुरुष गटातील स्पर्धा खेळवल्या गेल्या आहेत. श्रीलंकेने गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच 5 संघांची लंका प्रीमियर लीग स्पर्धा घेतली होती. गेल्या आठवड्यापासून श्रीलंकेतही कोरोनाची संख्या वाढत आहे. सध्या दररोज 2000 प्रकरणे नोंदवली जात आहेत. श्रीलंकेने भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर पूर्णपणे बंदी घातली आहे.