श्रीदेवीचा ‘जबरा’ फॅन ! निधनानंतर केलं मुंडन, श्रीदेवीलाच पत्नी मानतो, रोज करतो पूजा, आजही अविवाहित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अदाकारा श्रीदेवीची 24 फेब्रुवारी रोजी दुसरी पुण्यतिथी होती. श्रीदेवीचे चाहते आजही तिच्या निधनाचं दु:ख पचवू शकलेले नाहीत. अलीकडेच तिच्या एका चाहत्यानं तिची दुसरी पुण्यतिथी साजरी केली. या चाहत्याचं नाव आहे ओमप्रकाश मेहरा. ओमप्रकाश मध्यप्रदेशातील श्योपूर तहसिलच्या ददूनी गावचा रहिवासी आहे. ओम श्रीदेवीसाचा एवढा दीवाना आहे की, तो श्रीदेवीला मनापासून पत्नी मानतो. श्रीदेवीच्या पुण्यतिथीनिमित्त त्यानं गावात कार्यक्रम ठेवला आहे. जेवण दिलं. गेल्या वर्षीही त्यानं पुण्यतिथी साजरी केली होती.

श्रीदेवीच्या चाहत्यानं घातला होता तेरावा, केलं होतं मुंडन

24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवीच्या निधनाची बातमी ऐकून ओमप्रकाश मेहराला धक्का बसला होता. त्यानं काही दिवस काहीच खाल्लं नव्हतं. त्यानं श्रीदेवीच्या निधनानंतर मुंडन केलं होतं, शिवाय तेरावाही घातला होता.

श्रीदेवीसाठी राहिला अविवाहित

श्रीदेवीचा हा जबरा फॅन आजही अविवाहित आहे. श्रीदेवीच्या प्रेमाखातर त्यानं लग्न केलं नाही. सुरुवातीला कुटुंबानं त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला आणि जवळपास त्याला 19 मुली दाखवल्या. श्रीदेवीच्या प्रेमामुळं त्यानं सर्वांना रिजेटक्ट केलं.

29 दिवस पाहिला श्रीदेवीचा हा फेमस

ओमप्रकाश मेहरानं सलग 29 दिवस श्रीदेवीचा जस्टिस चौधरी सिनेमा पाहिला. यानंतर तो तिचा फॅन झाला. ओपी मेहरानं आपल्या घरात देवांच्या फोटोंसोबत श्रीदेवीचाही फोटो ठेवला आहे. आधी तो श्रीदेवीची पूजा करतो नंतर दिवसाची सुरुवात करतो.

वोटर कार्डवर लिहिलं श्रीदेवीचं नाव

अविवाहित ओमप्रकास मेहरा फक्त श्रीदेवीला आपली पत्नी मानतो. वोटर कार्डवरही त्यानं पत्नीच्या जागी श्रीदेवीचं नाव लिहिलं आहे.

You might also like