‘श्रीदेवी टॅलेंटेड होत्या पण तुझ्यात शून्य टॅलेंट आहे !’, जान्हवी कपूर झाली प्रचंड ट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   मॉम, इंग्लिश विंग्लिश, नागीण, चांदणी, लम्हे, पुली, सद्मा या सारख्या असंख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये आपला अभिनय गाजवणारी भारताची लोकप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी.  २४ फेब्रुवारी, २०१८ ला श्रीदेवी यांचे निधन झाले. श्रीदेवीच्या निधनाने साऱ्या बॉलीवूडमध्ये शोकाकुळ पसरले होते.

श्रीदेवीचा वारसा पुढे चालवण्या साठी त्यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर हिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. कारण जोहर च्या ‘धडक’ या चित्रपटातून जान्हवी कपूरने सिनेश्रुष्टीत एन्ट्री घेतली. त्या नंतर तिने ‘गुंजन सक्सेना’ व ‘रुही’ हे चित्रपटही केले. आता लवकरच जान्हवीचा कार्तिक आर्यन सोबत ‘दोस्ताना २’ हा चित्रपट येणार आहे.

q.JPG
जान्हवीचे चित्रपट आणि अभिनय हे काही जणांना आवडते तर काहीजण तिला तिच्या अभिनयावरून खूप ट्रोल करतात.

qq.JPG

असेच काहीतरी आता झाले आहे. फिल्मीज्ञान नावाच्या एका इंस्टाग्राम पेज ने जान्हवी कपूर आणि श्रीदेवीचा जुना व नवीन फोटो शेअर केला. या फोटोवर जान्हवी कपूरच्या चाहत्यांनी प्रेमाचा, लाईक्सचा आणि कंमेंट्सचा वर्षाव केला आहे.

qqq.JPG
जसं या फोटोवर चाहत्यांनी आवड दर्शवली आहे, तिथेच दुसऱ्या बाजूला तिला फार ट्रोल केलं आहे. एकाने लिहीलं कि, “तू तुझ्या आईसारखी सुंदर अजिबात नाही दिसत” तर दुसर्यांनी लिहिलं कि “श्रीदेवी या खूप टॅलेंटेड होत्या पण तू एक टॅलेण्टलेस मुलगी आहेस”.