‘या’ महान क्रिकेटरच्या निधनाच्या बातमीने सोशलवर खळबळ पण…

कोलंबो : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर सध्या श्रीलंकेचा प्रमुख फलंदाज आणि १९९६ च्या विश्वचषकात श्रीलंकेला चॅम्पियन बनवणारा खेळाडू सनथ जयसूर्या यांचे अपघाताने निधन झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. मात्र ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर खुद्द जयसूर्याने याबाबत ट्विट करुन भाष्य केले आहे. ‘ही बातमी खोटी असून, खोट्या बातम्या पसरवू नका’ असे त्याने ट्विट केले आहे.

अश्विननेही केले आश्चर्य व्यक्त
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनुसार जयसूर्याचे टोरंटो येथे एका अपघातात मृत्यू झाला असल्याची बातमी व्हायरल झाली होती. यावर भारताचा फिरकीपटू आर. अश्विन यानंही आश्चर्य व्यक्त करत, खरच असं झाले आहे की असा सवाल विचारला आहे. बातमीबाबत ट्विट करीत अश्विनने म्हणातले आहे की, ”जयसूर्या यांच्याबद्दल व्हायरल होत असलेली बातमी खरी आहे का. मला व्हॉटसअॅपवरुन अशी बातमी मिळाली, मात्र ट्विटरवर अशी बातमी मिळाली नाही”, यावर चाहत्यांनी अश्विनला ही बातमी खोटी असल्याची माहिती दिली.

जयसूर्या यांचा ट्विटवरून खुलासा
जयसूर्याच्या मृत्यूची बातमी पसरल्यानंतर यावर खुद्द जयसूर्यानं, ही बातमी खोटी असल्याचे ट्विटरच्या माध्यमातून सांगितले. जयसूर्यानं ट्विट करत, “मी एकदम ठीक आहे. आणि मुळात मी कॅनडामध्ये नाही तर श्रीलंकेतच आहे. कृपा करा आणि चुकीच्या बातम्या पसरवू नका”, स्पष्ट केले.

जयसूर्याच्या खेळावर बंदी
‘मॅच फिक्सिंग’ प्रकरणात जयसूर्या दोषी आढळल्यानंतर त्याच्या खेळावर बंदी घालण्यात आली आहे. श्रीलंकेतील एका वेबसाईटने हा दावा केला असून यात जयसूर्यासह श्रीलंकेच्या सात खेळाडूंचा समावेश असल्याचे वृत्त त्यांनी प्रसिद्ध केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या लाचलुचपत विभागाचे सरचिटणीस अॅलेक्स मार्शल यांचा सामवेश असलेल्या समितीने या प्रकरणाचा छडा लावला आहे.