श्रीमंत दगडूशेठ गणपती ‘श्री विश्वविनायक’ रथातून मार्गस्थ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

दहा दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी (दि.२३) बाप्पाला निरोप देण्यात आला. आज सकाळी मानाच्या गणपतींच्या मिरवणूकीने विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली. रात्री सातच्या सुमारास मानाच्या पाचव्या केसरी वाडा गणपतीचे विसर्जन झाले. त्यानंतर पुण्यातील इतर गणेश मंडळांचे गणपती विसर्जन मार्गावर मार्गस्थ झाले. सर्वांचे आर्कषण असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती नेहमीपेक्षा चार तास लवकर विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूकीसाठी खास ‘श्री विश्वविनायक’ रथ तयार करण्यात आला आहे. हा रथ विवेक खटावकर यांनी साकारला आहे. ‘श्री विश्वविनायक’ रथातून दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक निघणार आहे. अतिशय मनमोहक नक्षींनी हा रथ सजवण्यात आला आहे. मोती रंगाच्या २७ हजार दिव्यांनी उजळलेला हा रथ डोळे दिपावणारा आहे. त्यावर रंगीबेरंगी कोरीवकाम केलेले ५ कळस बसविण्यात आले आहेत. तसेच, २२५ आकर्षक झुंबर रथावर लावण्यात आले आहेत.

श्रीमंत दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. गणपती विसर्जन मिरवणूकीमध्ये पर्यावरण रथ तयार करण्यात आला आहे. तर लहान मुलांच्या वराकरऱ्यांचे पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच महिलांचे लेझीम पथक आणि महिलांनी सादर केलेल्या पारंपारिक खेळाला उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली. रथाच्या पुढे प्रभात बँड आणि दरबार बँडचे पथक सहभागी झाले होते. श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या रथाचे स्वारथ्य दहा बैल जोड्यांनी केले. श्रीमंतांचा हा थाट पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी झाली होती. तर तरुणाईला सेल्फीचा मोह आवरात आला नाही.
[amazon_link asins=’B071CY6D29′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’082b9c3a-bf73-11e8-9bfa-7d5d23169711′]
श्रीमंत दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पुण्यासह इतर शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे आणि योग्य नियोजनामुळे श्रीमंत दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक चार तास आगोदर विसर्जन मार्गावर आली होती.

यंदा गणपती विसर्जन मिरवणूकीत डिजे वाजवण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे पुण्यातील बहुतेक मंडळांच्या गणपती विसर्जन मिरवणूकीत पारंपारीक ढोल पथके सहभागी झाली होती. तर काही मंडळांनी निषेध नोंदवत डिजे वाजवून निषेध नोंदवला. पोलीस प्रशासनाने मंडळांचे डिजे बंद केल्याने काही ठिकाणी वादावादीचे प्रकार घडले. डिजे नसल्याने तरुणांचा उत्साह कमी पहायला मिळाला. मात्र,मंडळांच्या गणपती विसर्जन मिरवणूकीत सहभागी झालेल्या ढोलांच्या दणदणाटाने तरुणाई थिरकताना दिसत होती. ढोल ताशा पथकात सहभागी झालेल्या लहान मुलांपासून ते जेष्ठांपर्यंतचा उत्साह ओसंडून वाहत होता.