पाकिस्तानकडून काश्मीरातील शाळेवर गोळीबार, पाच शाळा बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे नापाक कारनामे अजून सुरूच आहेत पाकिस्तानी सेना व रेंजर्स यांनी कठुआच्या हीरानगर मधील अंतरराष्ट्रीय सीमेवर आणि पुंछच्या बालाकोट मधील सीमेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला आहे. पाकिस्तानि सैनिकांनी एका शाळेवर निशाणा साधला आहे. यामुळे घाबरलेले विद्यार्थी चार तास शाळेत अडकून होते.

पाकिस्तानी सैनिकांकडून वारंवार शाळांवर होणारे हल्ले लक्षात घेता कठुआ प्रशासनाने दोन दिवस शाळांना सुट्टी दिली आहे. पाकिस्तानकडून वारंवार या ठिकाणी मोठं मोठ्या शस्त्रांनी हल्ले केले जात आहेत.

पाकिस्तानकडून सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळा गोळीबार करण्यात आला. यावेळी मण्यारी मध्ये एका शाळेत साठ विद्यार्थी शिकत होते. पाकिस्तानकडून मोर्टारच्या साहाय्याने जोरदार हल्ला करण्यात आला. यावेळी शाळेतील वीस तीस मुलांना दुसऱ्या जागी हलवण्यात यश आले. मात्र बाकीचे विद्यार्थी अडकून बसलेले होते. याला भारतीय बीएसएफ ने चांगलेच प्रतिउत्तर दिले आहे.

शाळेचे शिक्षक जगदीश राज यांनी सांगिलते की, नंतर २ वाजता सर्व मुलांना घरी सोडण्यात आले, मात्र आता वरिष्ठांनी व सर्व शिक्षकांनी शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या सुरक्षेबाबत प्रबंध करण्यासाठी सांगितले आहे.

कठुआ चे मुख्य शिक्षा अधिकारी प्रेम नाथ यांनी सांगितले की, पाक गोळाबारी लक्षात घेता हीरानगरच्या पाच शाळांना पानसर, कड़याला, रठुआ, गुज्जर चक्क आणि मन्यारी दोन दिवस बंद ठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूछ येथे जेव्हा पाकिस्तानी सैनिकांनी हल्ला केला होता त्यावेळी शाळेत ऐकून ३०० विद्यार्थी होते. त्यांना फरशीवर झोपून, लपून राहून आपले प्राण वाचवावे लागले होते.

या गोळाबारीच्या माध्यमातून पाकिस्तान सैन्य दहशतवाद्यांचा गट भारतीय हद्दीत दाखल करण्याचा प्रयत्न करीत होता, सैन्य दलाच्या जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने हे हल्लेखोर अपयशी ठरले. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे सीमेवर कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही, परंतु तणाव कायम आहे.

पाकिस्तानच्या भूभागात गोळीबार करणे पाकिस्तान लष्कराकडून सातत्याने सुरू आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे आणि वारंवार भारताला पोकळ धमक्या देत आहे.

Visit – policenama.com 

You might also like