Bigg Boss : ‘पटत नसेल तर बघू नका, कुणी तुमच्यावर बंदूक ताणलेली नाही’ – सृष्टी रोडे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बिग बॉस हा शो अनेकदा वादात सापडला आहे. वादग्रस्त शो म्हणूनही हा शो ओळखला जातो. बिग बॉस 12 ची स्पर्धक राहिलेली अभिनेत्री सृष्टी रोडे हिला मात्र या शोमध्ये काहीही वाईट दिसत नाही. बिग बॉस सारखा शो भारतीय संस्कृतीसाठी घातक आहे. भारतीय संस्कृतीची मूल्ये पायदळी तुडवणारा आहे असा आरोप होत आला आहे. सृष्टी रोडे हिनं एका ताज्या मुलाखतीत यावर भाष्य केलं आहे.

सृष्टी म्हणाली, “मला असं काही अजिबात वाटत नाही. हा शो भारतीय संस्कृतीची पायमल्ली करतो असं माझं तरी मत नाहीये. जर तुम्हाला तसं वाटत असेल तर तुमच्याकडे पर्याय आहेत. पटत नसेल तर पाहू नका. तुम्हाला योग्य वाटतं तेच पहा. तुमच्या कानशीलाला बंदूक लावून कोणी तुम्हाला बिग बॉस पहा असं म्हणत नाहीये. तेव्हा इतका प्रॉब्लेम असेल तर बघू नका” असंही सृष्टी म्हणाली आहे.

पुढं बोलताना सृष्टी म्हणाली, “हा शो खरंच खूप एंटरटेनिंग आहे. यंदाच्या सीजनमधलेही सर्व स्पर्धक एंटरटेनिंग आहेत. एजाज खान, रूबिना, अभिनव हे मस्त एंटरटेन करताहेत” असंही तिनं सांगितलं.

निक्की तंबोलीबद्दल बोलताना सृष्टी म्हणाली, ती देखील एंटरटेनिंग आहे परंतु एंटरटेनिंग आणि इरिटेटींग यांच्या धूसर सीमा रेषा आहे.

सृष्टीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ये इश्क हाय या मालिकेतून तिनं लहान पडद्यावर एन्ट्री केली होती. शोभा सोमनाथ की तिची मालिका खूप गाजली होती. सृष्टीनं अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. बिग बॉस 12 मध्ये ती दिसली होती. तिचा परफॉर्मंस धम्माल होता. टीव्हीवरील ती एक फेसम चेहरा आहे. स्टाईल आणि बिंधास्त लुकसाठी सृष्टी ओळखली जाते.

https://www.instagram.com/p/CDv9oM2F0St/

https://www.instagram.com/p/CDlpUqglbMX/