‘कुमकुम भाग्य’ मालिकेतील ‘ही’ आदर्श सून ‘प्रज्ञा’ रिअल लाईफमध्ये दिसते एकदम ‘BOLD !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – झी टीव्हीवर प्रसारीत होणारी लोकप्रिय मालिका कुमकुम भाग्यमधील सून प्रज्ञा म्हणजेच अ‍ॅक्ट्रेस सृति झा सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. सृतिला टीव्ही वरील एक आदर्श सून म्हटलं जातं. सृति खऱ्या आयुष्यात मात्र खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. सध्या तिचे काही फोटो समोर आले आहेत.

काही दिवसांपूर्वीच ती स्पेनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत होती. याचेच काही फोटो सृतिने सोशल मीडियावर शेअर केले होते. कुमकुम भाग्यमधील प्रज्ञाच्या भूमिकेसाठी तिला बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा अवॉर्डही मिळाला आहे. सध्या सृतिच्या फोटोंची खूपच चर्चा होताना दिसत आहे.

आपल्या कुटुंबासासोबत कोलकाता, काठमांडू आणि दिल्लीत राहिल्यानंतर सृति मुंबईत पोहोचली. तिने 2007 साली धुम मचोओ धूम मधून अ‍ॅक्टींगच्या दुनियेत पाऊल टाकलं होतं.

सृतिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर तिने जिया जले, ज्योति, दिल से दी दुआ, सौभाग्यवती भव आणि बालिका वधू यांसारख्या मालिकेत काम केलं आहे. आपल्या बोल्ड फोटोंनी ती पुन्हा चर्चेत आली आहे.

 

Visit : Policenama.com