राज्य राखीव पोलीस बलातील जवान युनूस शेख यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – राज्य राखीव पोलीस बलामध्ये कार्यरत असणारे जवान युनूस कमरुद्दीन शेख (वय २७ रा. मेखळी ता.बारामती) यांचे आज रविवार दि. २८ जुलै २०१९ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते राज्य राखीव पोलीस बल गट क्र.५ दौंड येथे कार्यरत होते. त्यांच्यामागे वृद्ध आई, चार विवाहित बहिणी असा परिवार आहे. ते राष्ट्रीय दर्जाचे उत्कृष्ठ कबड्डीपटू होते त्यांनी एम.एस.पी.च्या वतीने राष्ट्रीय दर्जाची कबड्डी खेळले होते.

गडचिरोली येथे २०१८ साली नक्सलग्रस्त भागामध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांना किडनीचे इन्फेक्शन झाले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळत गेल्याने त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी राज्य राखीव बलातील गट क्र.५ चे अनेक अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त