सलमान खानवर ‘फिदा’ असलेल्या ‘या’ साऊथच्या अभिनेत्रीला हवी सलमान बरोबर ‘भुमिका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा दबंग सलमान खान अद्यापही अविवाहितच आहे. सलमान जरी सिंगल असला तरी त्याच्यावर जीव ओवाळणाऱ्या लाखो आहेत. एक अभिनेत्री तर सलमानवर भरभरून प्रेम करत होती. आज सलमान खान 53 वर्षांचा आहे परंतु त्याने स्वत:ला खूप मेंटेन ठेवलं आहे.

अनेक अभिनेत्रींनी सलमान सोबत काम केलं आहे. अनेकांनी त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. आज आपण अशा साऊथच्या अभिनेत्रीविषयी जाणून घेणार आहोत जी सलमानवर भरभरून प्रेम करते आणि तिला त्याच्या सोबत काम करण्याची इच्छा आहे. तिने स्वत: मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता.
image.png

सलमान खानवर जीव ओवाळणाऱ्या साऊथच्या अभिनेत्रीचं नाव आहे श्रुती हासन. प्रसिद्ध अभिनेता कमल हासन यांची मुलगी श्रुती हासन. श्रुतीने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. श्रुतीने एका मुलाखतीत म्हटले होते की, “मी सलमानची खूप मोठी फॅन आहे. मला त्याच्यासोबत सिनेमात काम करायचं आहे. मी त्यासाठी संधीची वाट पहात आहे.
image.png

अद्याप तरी सलमान खानची श्रुती हासनच्या वक्तव्यावर काही प्रतिक्रिया आलेली नाही. तुम्हाला सांगू इच्छितो की, सलमान खानचा भारत सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. या सिनेमात दिशा पाटनी आणि कॅटरीना कैफ या देखील मुख्य भूमिकेत दिसत आहेत. प्रेक्षकांना हा सिनेमा खूप भावला आहे असे दिसत आहे. सुनील ग्रोवर, जॅकी श्रॉफ, सोनाली कुलकर्णी हे कलाकारही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
image.png

image.png

Loading...
You might also like