RRR : ‘दसऱ्या’ला रिलीज होणार SS राजामौली यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा ! ‘बाहुबली’नंतर ‘ही’ कहाणी घालणार ‘धुमाकूळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय सिनेमा इतिहासातील सर्वात मोठा सिनेमा बाहुबली (Baahubali) चे डायरेक्टर एस एस राजामौली (S. S. Rajamouli) त्यांचा मेगा बजेट प्रोजेक्ट RRR वर काम करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. चाहत्यांनाही आरआरआर सिनेमाबद्दल खूप उत्सुकता होती. आता या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे.

सिनेमाच्या निर्मात्यांनी सोमवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितलं आहे की, हा सिनेमा 13 ऑक्टोबर 2021 रोजी दसऱ्याच्या दोन दिवस आधी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

आरआरआर सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर राजामौली बाहुबली सिनेमानंतर आता या सिनेमाचं डायरेक्शन करणार आहेत. राजामौलींचा हा सिनेमा दक्षिणसोबतच उत्तर भारतीयांसाठीही खूप खास असणार आहे. कारण यात राम चरण, ज्युनियर एनटीआर यांच्या व्यतिरीक्त बॉलिवूड स्टार अजय देवगण (Ajay Devgan) आणि ॲक्ट्रेस आलिया भट ही दिसणार आहेत. या सिनेमाच्या निमित्तानं ज्युनियर एनटीआर आणि राम चरण पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. हा सिनेमा अनेक भारतीय भाषांसोबतच तेलगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेतही रिलीज होणार आहे. आरआरआर या सिनेमाचं एक मोशन पोस्टरही रिलीज करण्यात आलं आहे.

सिनेमाच्या स्टोरीबद्दल बोलायचं झालं तर यात स्वातंत्र्यापू्र्वीची म्हणजेच 1920 च्या आसपासची स्टोरी आहे. ही स्टोरी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणाऱ्या दोन खऱ्या क्रांतिकारकांची आहे ज्यांची नावं आहेत अल्लूरी सीतारामा राजू आणि कोमारामा भीम.