सॅलरी मिळणार्‍या जवानांना शहीद म्हणणं योग्य नाही…लेखिकेची Facebook पोस्ट, करण्यात आली अटक

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   आसाममधील ४८ वर्षीय लेखिकेला मंगळवारी देशद्रोह आणि अनेक वेगवेगळ्या आरोपाखाली गुवाहाटी पोलिसांनी अटक केली आहे. शिखा शर्मा नावाच्या महिलेने आपल्या फेसबुक पोस्टवर छत्तीसगडमध्ये माओवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना शहीद मानण्यास नकार दिला आहे. त्या म्हणाल्या की, सेवेदरम्यान प्राण गमावलेल्या पगाराच्या व्यावसायिकांना शहीद दर्जा देता येणार नाही. या तक्रारीनंतर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.

गुवाहाटी पोलीस आयुक्त मुन्ना प्रसाद गुप्ता म्हणाले की, शिखा शर्मा यांच्यावर IPC च्या अनेक कलमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात देशद्रोहाचा आरोप- IPC १२४ A जोडले गेले आहे. शिखाला बुधवारी न्यायालयात दाखल केले जाईल. सांगितले जात आहे की, शिखा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात. त्यांनी सोमवारी आपल्या फेसबुकवर लिहले होते, ”पगार घेणारे व्यवसायिकांनी सेवे दरम्यान जीव गमावलास त्यांना शहीद मानले जाऊ शकत नाही. त्यानुसार विद्युत विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा करंटमुळे मृत्यू झाल्यास त्यालाही शहीद दर्जा मिळाला पाहिजे.”

शिखा शर्मा यांच्या या पोस्टवर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. यानंतर गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या दोन वकील उमी डेका बरुआ आणि कंगना गोस्वामी यांनी लेखिकेविरुद्ध दिसपूर पोलीस ठाण्यात FIR दाखल केले आहे. त्या म्हणाल्या, ”हा आमच्या सैनिकांच्या सन्मानाचा अपमान आहे.” अशा विधानांमुळे आमच्या सैनिकांच्या बलिदानाची केवळ पैशांशी तुलनाच होत नाही, तर या सेवेच्या आत्म्यावर आणि शुद्धतेवर शाब्दिक हल्ला केल्यासारखेच आहे.

नक्षलवाद्यांजवळील कोब्रा जवानाला सोडण्यासाठी ठेवली अट

तीन दिवसांपूर्वी CRPF च्या झालेल्या चकमकीत सुकमा-विजापूर सीमेवरून अपहरण झालेल्या कोब्रा युनिटच्या जवानाला सोडण्यासाठी अट नक्षलवाद्यांनी घातली आहे. मंगळवारी माओवाद्यांनी जवान सोडण्यासाठी सरकारला संवाद्काराचे नाव देण्यास सांगितले आहे. यानंतर आम्ही जवानाला सोडून देऊ, तोपर्यंत तो आमच्या संरक्षणाखाली सुरक्षित राहील.

CRPF च्या स्पेशल कोब्रा युनिटचा शिपाई राकेश्वर सिंग मनहास चकमकीनंतर बेपत्ता असल्याने पोलिसांनी रविवारी सांगितले होते. त्यानंतर CRPF चे अधिकारी त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जम्मूला गेले.