दहावीचा निकाल जाहीर, ८९.४१ टक्के राज्याचा निकाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा 89.41 टक्‍के निकाल लागला असल्याची माहिती राज्य बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली. तर दरवर्षी प्रमाणे यंदा देखील मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल 91.97 टक्के तर मुलांचा 87.27 टक्के लागला आहे. तसेच निकालाची तारीख येत्या दोन दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शकुतंला काळे म्हणाल्या की, राज्यात 17 लाख 51 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.यामध्ये पुणे विभागाला निकाल 92.08 टक्‍के लागला आहे. राज्यात शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या ३२ आहे. तर शंभर टक्के निकलाच्या शाळा ४ हजार २८ इतक्या आहे. तसेच १२५ विद्यार्थांना १०० टक्के गुण मिळाले असून मागील वर्षी १९३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये.यासाठी दहावीची लगेच १७ जुलै २०१८ पासून फेर परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेला अनुत्तीर्ण विद्यार्थां बरोबरच श्रेणी सुधार करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांनाही परीक्षा देता येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
निकालाची वैशिष्ट्ये

निकालाची विभागीय टक्केवारी.
१) कोकण : ९६.०० टक्के
२) कोल्हापूर : ९३.८८ टक्के
३) पुणे : ९२.०८ टक्के
४) मुंबई : ९०.४१ टक्के
५) औरंगाबाद : ८८.८१ टक्के
६) नाशिक : ८७.४२ टक्के
७) अमरावती : ८६.४९ टक्के
८) लातूर : ८६.३० टक्के
९) नागपूर : ८५.९७ टक्के