‘SSC’ नं केली घोषणा ! ‘मल्टी टास्किंग स्टाफ’साठी होणार 7,099 पदांवर भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टाफ सिलेक्शन कमिशनने आता मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) non-technical पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. जनरल सेंट्रल सर्विस ग्रुप ‘C’ नॉन-गॅजेटेड (General Central Service Group ‘C’ Non-Gazetted), नॉन-मिनिस्टेरिअल (Non-Ministerial) या पदांसाठी एकूण 7,099 जागांवर भरती होणार आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशनने मल्टी टास्किंग स्टाफ टीयर 1 चा निकाल 5 नोव्हेंबरला घोषित केला होता. या परिक्षेत पास झालेले उमेदवार आता पुढील परिक्षेत सहभागी होतील. ही परिक्षा 2 ऑगस्ट ते 22 ऑगस्टच्या दरम्यान झाली होती. 19.18 लाख उमेदवारांनी परिक्षा दिली होती. आता यात उत्तीर्ण झालेले उमेदवार पुढील टीयर 2 ची परिक्षा देतील.

या परिक्षेच्या नोटिफिकेशनवेळी एसएससीने रिक्त जागांची घोषणा केली नव्हती. तेव्हा SSC ने मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी जवळपास 10 हजारपेक्षा जास्त जागा रिक्त असल्याचे घोषित केले होते.

24 नोव्हेंबरला होणाऱ्या या टीयर 2 परिक्षेचे प्रवेशपत्र SSC लवकरच वेबसाइटवर जाहीर करेल. या पेपरमध्ये निबंध, पत्रलेखन देखील असेल. हा पेपर क्वालिफाइंग असेल. पेपर 1 आणि पेपर 2 च्या कट ऑफच्या आधारे पुढील प्रकियेसाठी पात्र उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येईल. त्यानंतर अखेर निवड केलेल्या उमेदवारांनी विविध राज्यात नियुक्ती करण्यात येईल.

Visit : Policenama.com