यंदा १० वी चा ‘टक्‍का’ कमालीचा घसरला ; ७७.१० टक्के विद्यार्थी उत्‍तीर्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. नेहमीप्रमाणेच यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. यंदा निकालाचा टक्का कमालीचा घसरला असून ७७.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यंदा दहावीची परीक्षा १ मार्च २०१९ ते २२ मार्च २०१९ दरम्यान घेण्यात आली होती. राज्यात १६ लाख ३९ हजार ८६२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी जवळपास १२ लाख विद्यार्थी पास झाले. निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल ८८. ३८ % लागला आहे तर नागपूर विभागाचा ६२. २७ % सर्वाधिक कमी निकाल लागला आहे. पुणे विभागाचा ८२. ४७ % निकाल लागला आहे.

येथे पहा निकाल –

दहावीचा निकाल बोर्डाच्या http://www.mahresult.nic.inhttp://www.result.mkcl.orghttp://www.maharashtraeducation.com
या संकेतस्थळावर ऑनलाइन पाहता येणार आहे. दुपारी १ वाजल्यापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

असा पहा निकाल –

१० वीचा निकाल पाहण्यासाठी दिलेल्या बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट जा.
त्यानंतर रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर रोल नंबर, नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करा.