नोकरीची सुवर्णसंधी ! SSC CGL चं नोटिफिकेशन जाहीर, फॉर्म भरण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कर्मचारी भरती आयोगाच्या (Staff Selection Commission) CGL च्या विविध भरती परीक्षांच्या ऑनलाईन फॉर्म भरण्याला सुरुवात झाली आहे. २ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन फी भरता येणार आहे, तर ऑफलाईन चलान ४ फेब्रुवारीपर्यंत जनरेट करता येणार आहे. याची रक्कम ६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत देता येणार आहे. टायर-१ परीक्षा २९ मे २०२१ ते ७ जून २०२१ पर्यंत होणार आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने आपली वेबसाईट ssc.nic.in वर यासाठी सुविधा उपलब्ध केली आहे. परीक्षार्थी ३१ जानेवारी २०२१ पर्यंत विविध पदांसाठी अर्ज करू शकतात. .

SSC CGL २०२० साठी असा भरा अर्ज
– गुगलवर जाऊन सर्चबॉक्समध्ये SSC टाईप करा

– कमिशनच्या वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करा

– होम पेजवर अप्लाय या पर्यायावर क्लिक करा

– CGL ची निवड करा आणि ऍप्लिकेशन लिंकवर क्लिक करा

– या लिंकवर गरजेची असलेली माहिती भरा आणि तुमचा फोटो आणि सही अपलोड करा

– एप्लिकेशन सबमिट करा आणि ऍप्लिकेशन फी भरा

– याची प्रिंट भविष्यातील वापरासाठी काढून ठेवा

नोंदणीकृत युजर नसणाऱ्यांना रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळवण्यासाठी पहिले नोंदणी करावी लागणार आहे. रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळवल्यानंतरच एप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे. फॉर्म भरण्याआधी अर्जदारांनी पात्रतेचे मापदंड बघावेत, कारण त्यांचा अर्ज जर ते नियमांमध्ये बसत नसतील तर कधीही त्यांची पात्रता रद्द केली जाऊ शकते.

निवड प्रक्रिया टायर- १, टायर-२, टायर- ३ आणि टायर – ४ मध्ये विभागली गेली आहे. टायर- १, टायर- २ च्या परीक्षा कॉम्प्युटरवर घेतल्या जातील. यासाठी ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न विचारले जातील. टायर- १ पास झालेल्यांना टायर-2 परीक्षा द्यावी लागेल. यानंतर टायर-२ परीक्षा पास होणाऱ्यांना टायर-३ परीक्षा द्यावी लागणार आहे. ही परीक्षा पास झाल्यावर कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट किंवा डेटा एन्ट्री स्किल टेस्ट घेण्यात येईल.