SSC Exam | ऑल द बेस्ट! उद्यापासून 10 वीची परीक्षा सुरु, राज्यात 15 लाख 77 हजार विद्यार्थी देणार परीक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला (SSC Exam) गुरुवार (दि. 2 मार्च) पासून सुरुवात होत आहे. यंदा राज्यातील 9 विभागीय मंडळातील 5 हजार 33 केंद्रावर ही परीक्षा होत आहे. या परीक्षेला (SSC Exam) राज्यातून 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थी बसले आहेत. दहावीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत होणार आहे. बारावी प्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांना देखील परीक्षेच्या निर्धारित वेळेपेक्षा दहा मिनिटे जास्त दिला जाणार असल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष (State Board of Secondary and Higher Secondary Education) शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी दिली.

 

राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागात दहावीची परीक्षा (SSC Exam) होत असून 20 हजार 10 शाळेतील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. सकाळच्या सत्रातील परीक्षेसाठी साडेदहा आणि दुपारच्या सत्रातील परीक्षेसाठी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना पोहोचावे लागेल. विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्राच्या परीक्षेसाठी 11 वाजता तर दुपारच्या सत्राच्या परीक्षेसाठी 3 वाजता प्रश्नपत्रिकेचे वाटप केले जाणार आहे.

 

271 भरारी पथकांची नेमणूक
परीक्षेच्या काळात कॉपीला आळा घालून परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी मंडळामार्फत 271 भरारी पथकांची नेमणूक केली आहे. यासोबत प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्य़रत आहे. विभागीय मंडळानेही विशेष भरारी पथकांची स्थापना केली आहे.

 

परीक्षार्थी विद्यार्थी संख्या
मुली – 7 लाख 33 हजार 067
मुले – 8 लाख 44 हजार 116

 

Web Title :- SSC Exam | 15 lakh 77 thousand students will appear for the 10th exam in the state

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Chinchwad Bypoll Election Results | 37 फेऱ्यांनतर ठरणार चिंचवडचा भावी ‘आमदार’, मतमोजणीला लागणार 14 तास

Pune Crime News | ब्रॅण्डेड कपड्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक; गुन्हे शाखेकडून एकावर गुन्हा, लाखोंचे कपडे जप्त

Ajit Pawar | ‘आशिष शेलारांच्या मताशी मी सहमत, त्यांना समज दिली पाहिजे’, संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितले