SSC Exam Results | पुण्यातील शाळांमध्ये 10 वीच्या गुणपत्रिका 9 ऑगस्टपासून मिळणार

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  SSC Exam Results | महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून (Maharashtra State Higher Secondary Board) घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी (SSC Exam Results) परीक्षेचा निकाल (SSC exam Results) 16 जुलै रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइनच्या साहाय्याने आपला निकाल (Result) बघितला. मात्र आता विद्यार्थ्यांना निकालपत्रकाची इच्छुकता लागली आहे. याचप्रमाणे आता पुण्यातील शाळॆत (Pune School) इयत्ता 10 वीच्या गुणपत्रिका 9 ऑगस्टपासून देण्यात येणार आहेत. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही ठराविक दिवशीच गुणपत्रिका नेण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर करू नये, अशा सूचना देखील शाळांना दिल्या आहेत.

राज्य शासनाकडून (State government) शाळांना गुणपत्रिका वितरणाबाबत काही सूचना देण्यात आल्या आहेत. विभागीय मंडळाकडून (Divisional Board) शाळांना 7 ऑगस्ट तसेच, 9 ऑगस्टला गुणपत्रिका वितरित करण्यासाठी दिल्या जातील. नंतर, शाळांनी 10 वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार शासनाच्या नियमांचे पालन करून गुणपत्रिका द्याव्यात, असं म्हटलं आहे. या दरम्यान, राज्यातील 99. 95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के इतका आहे.

 

या दरम्यान, कोरोनाकाळात शिक्षणापासून दुरावण्याची शक्यता असलेल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीच्या ऑनलाइन शिक्षणाची सोय व्हावी.
या अनुषंगाने जिल्हा परिषदेने इन्फोसिस कंपनीच्या सहकार्याने नवे ई-लर्निंग ॲप (E-learning app) विकसित करण्यात आलेत.
म्हणून जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) शाळांतील विद्यार्थ्यांना घरबसल्या परीक्षा देणे शक्य होणार आहे.
तर, या ॲपचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील आठवडाभरात ते सुरु होईल.
पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ (CEO of Zilla Parishad) आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांनी विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांबाबतच्या संशोधनांचा अभ्यास करून स्वतः या ॲपची रचना केली आहे.

 

Web Title : SSC Exam Results | ssc exam results marksheets in pune school will be distributed from 9 august 2021

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sugarcane Juice | ऊसाचा रस लीव्हरसाठी खुपच ‘हेल्दी’, वायरल इन्फेक्शनपासून होईल बचाव, इम्यूनिटी वाढते

Coronavirus | राज्यातील ST महामंडळाच्या बसेसला करणार अँटी मायक्रोबियल कोटिंग, व्हायरस पसरण्यापासून रोखणार

Pune Crime | घरासमोर ‘खरकटे पाणी’ टाकल्याच्या वादातून कुर्‍हाडीने ‘वार’; किरकोळ कारणावरुन केला खुनाचा प्रयत्न