10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! स्टाफ सिलेक्शन कमिशनअंतर्गत होणार बंपर भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   स्टाफ सिलेक्शन कमिशनअंतर्गत (SSC) १० वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीसाठी सुवर्ण संधी आहे. केंद्रीय निमलष्करी पोलीस दलांत GD कॉन्स्टेबल पदासाठी ५५ हजार ९१५ जागेसाठी बंपर भरती घेण्यात येणार आहे. तर याबाबत आसाम रायफल्समधील भरती तारखेची सूचना मे महिन्याच्या साधारण पहिल्या आठवड्यात जाहीर केली जाणार आहे. याबाबत अशी माहिती स्टाफ सिलेक्शन कमिशनने दिली आहे. या भरतीबाबत सविस्तर माहिती SSC च्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

हि परीक्षा २ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट महिन्यादरम्यान ऑनलाईनद्वारे होण्याची शक्यता आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशननं जाहीर केलेल्या परीक्षांच्या कॅलेंडरनुसार १० मेपर्यंत GD कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करता येणार आहेत. दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात.

या भरतीसाठी पदे –

– सीमा सुरक्षा बल (BSF)

– केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF)

– केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)

– इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP)

– सशस्त सीमा बल (SSB)

– नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सी(NIA )

– सचिवालय सुरक्षा बल (SSF)

निवड प्रक्रिया –

या भरतीमध्ये ४७५८२ जागा पुरुष तर ८३३३ जागा महिला उमेदवारांसाठी आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची प्रथम कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा घेतली जाईल. त्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांची शारीरिक चाचणी घेतली जाईल. शारीरीक क्षमता चाचणी घेतल्यानंतर मेडिकल चाचणी घेण्यात येईल.

शैक्षणिक पात्रता –

१० वी उत्तीर्ण

वयाची अट –

१८ ते २३ असणे आवश्यक. ऑनलाईन परीक्षेमध्ये सामान्यज्ञान, गणित, हिंदी आणि इंग्रजी, तार्किक क्षमता याविषयी प्रश्न विचारले जातात.

वेतन –

GD कॉन्स्टेबल पदासाठी – २१७०० ते ६९१००

परीक्षांसाठी फी –

खुल्या प्रवर्गासाठी १०० रुपये तर, महिला, SC , ST आणि माजी सैनिकांसाठी कोणतीही फी नाही.