SSC Selection Post Phase VII 2019 : ‘या’ महिला उमेदवारांसाठी आयोगाने जारी केले ‘अपडेट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी निवड आयोगाने (SSC) सिलेक्शन पोस्ट फेज 7 मध्ये गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर (पोस्ट कोड CR12419) च्या पदांसाठी शॉर्टलिस्टेड अतिरिक्त महिला उमेदवारांसाठी कागदपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख वाढविली आहे. या महिला उमेदवार आता 30 जून 2020 पर्यंत आपली कागदपत्रे जमा करु शकतात. यापूर्वी, कागदपत्रे सादर करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2020 होती, परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, 25 मार्च 2020 पासून देश लॉकडाऊनमध्ये आहे. अशा परिस्थितीत काही उमेदवारांना त्यांचे कागदपत्र सादर करता आले नाही. आता आयोगाकडून उमेदवारांना आणखी एक संधी देण्यात आली आहे.

कर्मचार्‍यांच्या निवड आयोगाने स्पष्ट केले आहे की, उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, आरक्षण श्रेणी, वय, वयामध्ये सूट, अनुभव इत्यादी स्व-प्रमाणित कागदपत्राशी संबंधित प्रमाणपत्रांच्या हार्ड प्रती ऑनलाइन अर्जाच्या प्रतीसह जमा कराव्यात. ही सर्व कागदपत्रे 30 जून 2020 च्या नवीन अंतिम मुदतीपर्यंत प्रादेशिक कार्यालयात सादर करावे लागतील. उमेदवारांनी नोंद घ्यावी की, संलग्न कागदपत्रे केवळ स्पीड पोस्टद्वारे पाठवावी लागतील.

असे तपासा नोटिफिकेशन
उमेदवारांनी Ssc च्या ssc.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर जावे . मुख्यपृष्ठावर नोटिफिकेशन लिंक इम्पोर्टेन्ट नोटिस एक्सटेंशन ऑफ टाइम टू सबमिट डॉक्यूमेंट फॉर पोस्ट कॅटेगिरी नंबर 12419 वर क्लिक करा. आता नोटिफिकेशन तुमच्यासमोर उघडेल. यामध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि देण्यात आलेल्या महत्त्वाच्या माहितीच्या आधारे उमेदवारांनी त्यांचे कागदपत्र अंतिम तारखेपूर्वी नियुक्त प्रांतीय कार्यालयात पाठवावे. गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर, पोस्ट कोड सीआर 12419 च्या डॉक्युमेंट स्क्रूटनीसाठी 17 महिला उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले गेले आहे.