SSC-HSC Board Exams | 10 वी, 12वीच्या विद्यांर्थ्यांसाठी खुशखबर ! आता परीक्षेसाठी उपलब्ध होणार Question Bank; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – SSC-HSC Board Exams | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (Coronavirus in Maharashtra) राज्यात गेल्या दोन वर्षात 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांमध्ये (SSC-HSC Board Exams) विस्कळीतपणा आला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यातच यावर्षी अनेक महिने शिक्षण ऑनलाइन (Online Education) देण्यात आले. त्यामुळे एका बाजूनं ऑफलाईन विद्यार्थी (Offline Exams) विरोध करत आहेत तर राज्य सरकारनंही बोर्डाच्या (Board Exams) परीक्षा ऑफलाईनच होणार याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परंतु आता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता राज्य सरकारकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपेढी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

 

राज्य सरकारच्या (State Government) शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार 10 वी आणि 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षा (SSC-HSC Board Exams) देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य मंडळाच्या (State Board) इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन (State Educational Research) व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (Training Council, Maharashtra) तर्फे विषयनिहाय Question Bank विकसित करण्यात आल्या आहेत. 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी केले आहे.

 

परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सराव, स्वयंअध्यायनासाठी या प्रश्नपेढ्यांची मदत होईल आणि परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल, या हेतूने हे प्रश्नसंच तयार केले जात आहेत. या Question Bank  www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

 

Web Title :- SSC-HSC Board Exams | maharashtra questions will be available for board exam students in maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MPSC Exam | MPSC विद्यार्थ्यासाठी महत्वाची माहिती ! वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

 

Sangli Crime | सांगली जिल्ह्यात ‘सैराट’ ! प्रेमविवाह केला म्हणून तरुणावर प्राणघातक हल्ला; परिसरात खळबळ

 

राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये OBC Reservation चा मार्ग मोकळा होणार? राज्य मागासवर्गीय आयोगाचा अंतरिम अहवाल शनिवारी तयार होणार