SSC-HSC Exam 2022 | ’10 वी -12 वीच्या परीक्षा महिनाभर पुढे ढकला’ – मंत्री बच्चू कडू यांच्या सूचना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – SSC-HSC Exam 2022 | गेल्या काही दिवसांपूर्वी 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे (SSC-HSC Exam 2022) वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. कोरोनाच्या महामारीत या दोन्ही परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. यंदा 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचं नुकतंच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी म्हटलं होतं. दरम्यान, आता या परीक्षा नियमित वेळापत्रकानूसार न घेता महिनाभर पुढे ढकला, अशा सूचना शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी ऑनलाईन बैठकीत दिल्या आहेत. यामुळे 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा महिनाभर पुढे जाणार का ? अशा चर्चा होऊ लागल्या आहेत.

मार्च महिन्यात होणार्‍या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्या, अशा सूचना शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीत केल्या आहेत. मागील 2 वर्षांत शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास आणि लिखाणाचा सराव झालेला नसल्याने ही मागणी केली जात होती. अशी माहिती राज्य मंडळातील अधिकार्‍यांनी दिली आहे. (SSC-HSC Exam 2022)

बैठकी दरम्यान बच्चू कडू म्हणाले की, ”मुलांचा लिखाणाचा सराव सुटल्याने त्यांना परीक्षेत अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच राज्यात सध्या शाळांबाबत ऑनलाईन, ऑफलाईनचा जो काही घोळ सुरू आहे, त्यामुळेही विद्यार्थी संभ्रमात आहेत. तसेच अभ्यासक्रमही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे मार्च महिन्यात होणार्‍या 10 वी-12 वीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्यात, असं ते म्हणाले. दरम्यान, त्यामुळे आता राज्य मंडळाचे अधिकारी प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविणार आहेत. त्यानुसार परीक्षा केव्हा होणार ?  हे ठरवून टाईम टेबल जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे.

Web Title : SSC-HSC Exam 2022 | 10th – 12th exams postponed for a month  Suggestions of Minister Bachchu Kadu

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’