SSC HSC Exam Offline | इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार, राज्य शिक्षण मंडळाची घोषणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – SSC HSC Exam Offline | गेल्या अनेक दिवसांपासून 10 वी आणि 12 वीची परीक्षाबाबत विद्यार्थ्यांना जो संभ्रम निर्माण झाला होता त्यावर आज महामंडळाच्यावतीने 10 वी आणि 12 वीच्या परिक्षेबाबत खुलासा करण्यात आला आहे.10 वी आणि 12 वीच्या परीक्षा या ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईन (SSC HSC Exam Offline) पद्धतीनेच होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाचे (maharashtra state secondary and higher secondary board) अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी दिली आहे.

 

परीक्षेचा कालावधी
मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार 12 वीची परीक्षा 20 फेब्रुवारी दरम्यान व इ. 10 वीची परीक्षा 01 मार्च दरम्यान सुरु करण्यात येते. पण चालू वर्षी नेहमीपेक्षा सुमारे दोन आठवडे उशिराने म्हणजेच इ. 12 वी लेखी परीक्षा दि. 04 मार्च 2022 ते दि. 30 मार्च होणार आहे. श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन दि. 14 फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत होणार आहे. (SSC HSC Exam Offline)

 

1. इ. 10 वी लेखी परीक्षा दि. 15 मार्च 2022 ते दि. 04 एप्रिल 2022

श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन दि 25 फेब्रुवारी 2022 ते दि. 14 मार्च 2022

 

2. विद्यार्थी संख्या सद्यस्थितीत मंडळाकडे परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी

इ. 12 वी – 14,72,562

इ. 10 वी – 16,25,311

 

3. विषय माध्यम व प्रश्नपत्रिका संख्या
मंडळाची परीक्षा सार्वत्रिक स्वरूपाची असून संपूर्ण राज्यात एकाच वेळी एकसमान प्रश्नपत्रिकेवर आयोजित केली जाते. यामध्ये वस्तुनिष्ठ लघुत्तरी व दिर्घोत्तरी प्रश्नांचा समावेश असतो. इ. 12 वी विषय 158, विज्ञान शाखा माध्यम 04, इतर शाखा माध्यम 06 प्रपत्रिका संख्या 356 (SSC HSC Exam Offline)

इ. 10 वी विषय 60 माध्यम 08, प्रश्नपत्रिका संख्या 158

 

4. परीक्षेत विविध घटकांचा सहभाग –
सदर परीक्षांसाठी प्रामुख्याने मुख्याध्यापक, प्राचार्य, केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, परिक्षक, मुख्य नियामक, नियामक परीक्षक, लिपिक व चतुर्थश्रेणी कर्मचारी तसेच सर्व भरारी पथक यांचा सहभाग असणार आहे.

 

Web Title :- SSC HSC Exam Offline | Class 10 and Class 12 examinations will be held offline maharashtra state secondary and higher secondary board has announced

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा